Home महाराष्ट्र PCMC Crime News:पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी कटिंग करणारे दोघे सराईत आरोपी व एक विधीसंघर्षित बालक ताब्यात

PCMC Crime News:पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी कटिंग करणारे दोघे सराईत आरोपी व एक विधीसंघर्षित बालक ताब्यात

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – पीएमपीएल बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका वयोवृद्ध महिलेच्या हातातील सुमारे १ लाख ५ हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी कटिंग करून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे निगडी पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकीस आला (PCMC Crime News) आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, महिला पोलीस हवालदार दळे, पोलीस हवालदार डगळे, जयवंत राऊत व पोलीस शिपाई चिखलकर हे पथक बसमधील बांगडी कटिंग चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत(PCMC Crime News) होते.

पोलीस शिपाई चिखलकर यांना मधुकर पवळे उड्डाणपूल परिसर, निगडी बसस्टँड येथे तीन संशयित इसम थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन तिघांना शिताफीने ताब्यात (PCMC Crime News)घेतले.

चौकशीत त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली –

विकी उर्फ बायो कृष्णा माने (वय 21, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे)

कुलदीप उर्फ कुणाल संजय साळुंखे (वय 22, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे)आणि एक – विधीसंघर्षित बालक.त्यांची अंगझडती घेतली असता १० ग्रॅम वजनाची, कटिंग केलेली सुमारे १,०५,००० रुपये किंमतीची सोन्याची बांगडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तपासात निष्पन्न झाले की, संबंधित वयोवृद्ध महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. 106/2026 दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले (PCMC Crime News)आहे.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

आरोपी कुलदीप उर्फ कुणाल साळुंखे याच्यावर चंदननगर व मुंढवा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट, मारहाण, दरोड्याची तयारी इत्यादी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सदर दोन्ही आरोपी व विधीसंघर्षित बालकास जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी निगडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (PCMC Crime News)आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00