चिंचवड (प्रतिनिधी):
चिंचवड येथील एका कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये (Bank Fraud Embezzlement) तब्बल चार कोटी ९० लाख ७८ हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पतपेढीचे माजी व्यवस्थापक आणि माजी अध्यक्षासह पाच जणांविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ५५ वर्षीय फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २००७ ते २०२५ या कालावधीत पतपेढीचा व्यवस्थापक म्हणून काम करताना ठेवीदारांकडून घेतलेली सुमारे तीन कोटी ८५ लाख रुपयांहून अधिक रक्कम परत केली नाही. उलट, ही (Bank Fraud Embezzlement) रक्कम स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर वळवून गैरवापर केल्याचे समोर आले आहे.
या गैरव्यवहारात पतपेढीच्या माजी अध्यक्षांनीही आरोपीस आर्थिक व्यवहारात सहकार्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून एकूण चार कोटी ९० लाख रुपयांचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
चिंचवड पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी(Bank Fraud Embezzlement) प्रकरण पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

