पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) सर्वसाधारण सभेत ६० कोटी रुपयांच्या कथित पुरवणी बिलांवरून मोठा गदारोळ उसळला. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण (PCMC Meeting) झाले.
महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी सादर करण्यात आलेल्या वाढीव (Supplementary) बिलांवर विरोधकांनी गंभीर आक्षेप घेतला. या बिलांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत त्यांनी याला ‘भ्रष्टाचाराचा नमुना’ म्हटले आणि प्रशासनाला धारेवर धरले. बिलांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेवरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी आणि वादावादी(PCMC Meeting) झाली.
दरम्यान, सत्ताधारी गटाने या बिलांचे समर्थन करत कामाच्या गरजेनुसार वाढीव खर्च झाल्याचे सांगितले. मात्र विरोधकांनी कामाच्या गुणवत्तेवर आणि खर्चाच्या तांत्रिक बाबींवर प्रश्न उपस्थित करत सभेचे कामकाज काही काळ रोखून (PCMC Meeting)धरले.
या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित बिले मंजूर करू नयेत, अशी ठाम मागणी विरोधकांनी केली. गोंधळ वाढल्याने सभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. या कथित प्रकरणाची शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली (PCMC Meeting)आहे.
