चिंचवड : औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त भविष्य देण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी (MLA Shankar Jagtap)केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित ‘हरित पिंपरी-चिंचवड शहर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत (MLA Shankar Jagtap)होते.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर माई ढोरे, नवनाथ जगताप, हर्षल ढोरे, ज्ञानेश्वर (माऊली) जगताप, पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे, रवीना आंगोळकर, दुर्गाकौर आदियाल, महामंत्री मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथही घेण्यात (MLA Shankar Jagtap)आली.
आमदार जगताप म्हणाले, “झाड लावणे ही केवळ औपचारिकता नसून भविष्यासाठी केलेली सामाजिक गुंतवणूक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे. ही मोहीम शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प (MLA Shankar Jagtap)आहे.”
ते पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा समतोल साधत पिंपरी-चिंचवडला स्मार्ट, हरित आणि शाश्वत शहर म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक (MLA Shankar Jagtap)आहे.
देशी वृक्षांच्या लागवडीवर भर
या अभियानांतर्गत शोभेच्या झाडांऐवजी बकुळ, कडुलिंब, कदंब, ताम्हण, बहावा आणि महोगणी यांसारख्या देशी व बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष पर्यावरण संवर्धनासोबतच जैवविविधता वाढविण्यासही उपयुक्त ठरणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या ताम्हण वृक्षाची लागवड करून सांस्कृतिक वारशाच्या जतनालाही प्राधान्य देण्यात (MLA Shankar Jagtap)आले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून पिंपरी-चिंचवडला ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखत प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून ही मोहीम लोकचळवळ बनवू,” असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त (MLA Shankar Jagtap)केला.
