(पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी (Pcmc Development Plan)दिला.
मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते ॲड. राहुल नार्वेकर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात (Pcmc Development Plan)आला.
यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी-चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या शाश्वत, नियोजित आणि दीर्घकालीन विकासाचे व्हिजन मांडले. या व्हिजनचे कौतुक करताना नार्वेकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे आणि आशिया खंडात नावाजलेले शहर आहे. गेल्या काही दशकांत गावाच्या स्वरूपातून विकसित शहरापर्यंत झालेली या शहराची झेप उल्लेखनीय (Pcmc Development Plan)आहे.

वाढते शहरीकरण आणि भविष्यातील गरजा यांची सांगड घालत उपलब्ध नागरी सुविधांचा सर्वांगीण विचार करून सूक्ष्म व नियोजनबद्ध विकासाचे मॉडेल उभे करण्याचे उद्दिष्ट आयुक्त सूर्यवंशी यांनी ठेवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांतून शहराला विकासाची नवी उंची मिळेल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त (Pcmc Development Plan)केला.
शहराचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून नागरिकांचे जीवनमान उंचावणे, प्रशासन सक्षम करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या दृष्टीने पिंपरी-चिंचवडमध्ये होत असलेले काम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद (Pcmc Development Plan)केले.
या वेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत विविध माध्यमांच्या संपादकांनी विचारलेल्या प्रश्नांना नार्वेकर यांनी दिलखुलास उत्तरे (Pcmc Development Plan)दिली.
५० वर्षांच्या विकासाचे विविध पैलू
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादरीकरणातून आगामी ५० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन, पवना व इंद्रायणी नदीकाठ विकास, ड्रेनेज मास्टर प्लॅन, शाश्वत घनकचरा व्यवस्थापन, आरक्षित जागांचा विकास, सार्वजनिक वाहतूक, शहरी नाले सुधारणा, डीपी रस्ते, डेटा सेंटर धोरण आणि पार्किंग धोरण आदी बाबी (Pcmc Development Plan)मांडल्या.
यासोबतच शहर सुशोभीकरण व हरितीकरण, उद्यानांचा विकास, रुग्णालय सेवा बळकटीकरण, भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे, प्रतिभा शोध कार्यक्रम, अभ्यासिका व व्यायामशाळांचा विस्तार, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वाभिमान धोरण, दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती, स्वच्छतागृह धोरण, क्रीडा सुविधा, पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन, सायन्स पार्क विकास, महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, निवृत्तीच्या दिवशी पेन्शन योजना, प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता आणि ‘स्वागतम ई-पास’ यांसारख्या उपक्रमांची माहिती त्यांनी (Pcmc Development Plan)दिली.

पत्रकारांनी प्रशासनाला आरसा दाखवावा
सन्मान स्वीकारताना आयुक्त सूर्यवंशी म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराने आपल्याला आपलेसे केले असून, शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. मिळालेल्या सन्मानामुळे जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली (Pcmc Development Plan)आहे.
नागरिकांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी प्रशासनाला नेहमी आरसा दाखवावा आणि त्या आरशात दिसणाऱ्या त्रुटी सुधारण्याचे काम प्रशासनाने करावे. पत्रकारांची टीका ही शहराच्या विकासासाठी आवश्यक सुधारणा ओळखण्याची संधी म्हणून स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी (Pcmc Development Plan)सांगितले.
शहराचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असून, पारदर्शक आणि सक्षम प्रशासनासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट (Pcmc Development Plan)केले.
सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल यशवंत भोसले, डी. के. भोसले, बाबा कांबळे, बाबासाहेब औटी आणि रवी घाटे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पत्रकारितेतील योगदानाबद्दल दुर्गेश सोनार, पितांबर लोहार, मिलिंद कांबळे आणि माधव सहस्त्रबुद्धे यांचा विशेष सन्मान करण्यात(Pcmc Development Plan) आला.
कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्यासह विविध माध्यमांचे संपादक, पत्रकार आणि नागरिक उपस्थित (Pcmc Development Plan)होते.
प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन (Pcmc Development Plan)केले.
