Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Property Tax:पिंपरी-चिंचवड,ऑनलाइन मालमत्ता कर भरा, मिळवा ४% सवलत; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

Pcmc Property Tax:पिंपरी-चिंचवड,ऑनलाइन मालमत्ता कर भरा, मिळवा ४% सवलत; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना सामान्य करावर ४% सवलत जाहीर केली आहे. थकबाकीदारांवर जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

by Admin
Spread the love

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ३ जुलै) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालू आर्थिक वर्ष (२०२६-२७) चा मालमत्ता कर ऑनलाइन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत जाहीर केली आहे. अद्याप कर न भरलेल्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाने केले (Pcmc Property Tax)आहे.

महापालिकेकडून एसएमएस, टेलीकॉलिंग आणि डेटा-आधारित संवाद प्रणालीद्वारे कर भरणा, सवलत योजना आणि थकबाकीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच कर भरण्याबाबतच्या अडचणींचे निराकरणही करण्यात येत (Pcmc Property Tax)आहे.

दरम्यान, कर थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली असून, १८ विभागीय कार्यालयांमार्फत आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर न भरलेल्या बिगर निवासी, औद्योगिक व मिश्र वापराच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तर निवासी मालमत्तांच्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले (Pcmc Property Tax)आहे.

महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त सचिन पवार यांनी नागरिकांनी वेळेत ऑनलाइन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा तसेच शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले (Pcmc Property Tax)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00