Home आरोग्य Cyclothan compitation :संडे ऑन सायकल’ सायक्लोथॉनमुळे रविवारी वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

Cyclothan compitation :संडे ऑन सायकल’ सायक्लोथॉनमुळे रविवारी वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

भारतीय खेल प्राधिकरणाच्या ‘संडे ऑन सायकल’ सायक्लोथॉन स्पर्धेमुळे ७ जून रोजी पिंपरी-चिंचवडमधील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्गांची माहिती जाहीर केली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने रविवार, ७ जून २०२६ रोजी ‘संडे ऑन सायकल’ या विशेष उपक्रमांतर्गत भव्य सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सायकलपटू सहभागी होणार असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले (Cyclothan compitation)आहेत.

 

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून रविवार, ७ जून रोजी सकाळी ५.३० ते १०.३० या वेळेत (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) वाहतूक नियंत्रण आदेश जारी केला(Cyclothan compitation) आहे.

 

सायक्लोथॉनचा मार्ग

 

राजीव गांधी ब्रीज – जगताप डेअरी चौक – काळेवाडी फाटा – पुनावळे-औंध-रावेत बीआरटी मार्ग – मुकाई चौक – अंकुश चौक आणि त्याच मार्गाने परतीचा प्रवास असा स्पर्धेचा मार्ग निश्चित करण्यात आला (Cyclothan compitation)आहे.

 

वाहतूक बंदी व पर्यायी मार्ग

 

– ढोरे पाटील अंडरपासकडून डी-मार्टकडे जाणारी वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी राजीव गांधी ब्रीज व ब्रेमन चौक मार्गाचा वापर करावा.

– ब्रेमन चौकाकडून ढोरे पाटील अंडरपासमार्गे डी-मार्टकडे जाण्यास मनाई असेल. नागरिकांनी अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा.

– शिवार चौकाकडून जगताप डेअरी मार्गे काळेवाडी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक जगताप डेअरी अंडरपासमार्गे सावित्रीबाई फुले उद्यानाजवळून वळविण्यात येईल.

– कस्पटे चौकाकडून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहनचालकांनी शिवार चौक मार्गे प्रवास करावा.

– काळा खडक परिसरातून डांगे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून डांगे चौक अंडरपास व थेरगाव फाटा मार्ग उपलब्ध राहील.

– बिर्ला हॉस्पिटलकडून डांगे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली असून अंडरपासमार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

– भक्ती-शक्ती चौकाकडून किवळे ब्रीजकडे येणारी वाहतूक मुकाई चौक येथे बंद राहील. या वाहनांना मरके वस्ती चौकामार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला (Cyclothan compitation)आहे.

 

नागरिकांना आवाहन

 

सांगवी, वाकड आणि देहूरोड वाहतूक विभागाच्या हद्दीतील नागरिकांनी रविवारी सकाळी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले (Cyclothan compitation)आहे.

 

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित मार्गांवर बॅरिकेडिंग, वाहतूक नियोजन आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली(Cyclothan compitation) आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00