पिंपरी-चिंचवड : आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि स्पष्टवक्त्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) येत्या शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांशी संवाद साधणार (Tukaram Mundhe)आहेत.
दिशा सोशल फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘खऱ्या अर्थाने जननायक – भेसळखोरांचा कर्दनकाळ… तुकाराम मुंढे’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना असून, त्यांच्या कार्यशैलीबाबत आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर संवाद साधला जाणार(Tukaram Mundhe)आहे.
तुकाराम मुंढे हे सध्या आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य या पदावर कार्यरत आहेत. अन्न व औषधांच्या गुणवत्तेशी संबंधित विषयांमध्ये प्रशासनाची भूमिका, नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता याबाबत त्यांच्या कामाचा अनुभव या संवादातून जाणून घेण्याची संधी नागरिकांना मिळणार (Tukaram Mundhe)आहे.
या कार्यक्रमाचे संवादक ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोपर्डे असून, कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे करण्यात आले (Tukaram Mundhe)आहे.
कार्यक्रमाची वेळ : शनिवार, २२ ऑगस्ट २०२६, सायंकाळी ५.३० ही असून कार्यक्रमासाठी मर्यादित आसनक्षमता असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले(Tukaram Mundhe) आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा संवाद प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांनी घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले (Tukaram Mundhe)आहे.
