Home गुन्हे Chikhali Dog Attack:चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर हल्ला; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Chikhali Dog Attack:चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर हल्ला; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

चिखलीच्या म्हेत्रेवस्ती परिसरात ७-८ भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला करून तिला जखमी केले. नगरसेवक यश साने यांनी तातडीच्या उपाययोजना आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

by Admin
Spread the love

पिंपरी : चिखलीतील म्हेत्रेवस्ती परिसरात ७-८ भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (Chikhali Dog Attack)आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य यश दत्ताकाका साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पशुवैद्यकीय विभागाच्या उपायुक्तांकडे पत्राद्वारे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली (Chikhali Dog Attack)आहे.

म्हेत्रेवस्ती तसेच संपूर्ण चिखली परिसरातील हिंसक आणि पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, अशी मागणी साने यांनी केली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी (Chikhali Dog Attack)केली.

चिखली परिसरात पुढील तीन दिवसांत युद्धपातळीवर भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही साने यांनी पत्रात नमूद केले (Chikhali Dog Attack)आहे.

 

दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तासांत ठोस उपाययोजना न झाल्यास संतप्त नागरिकांसह महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यश साने यांनी दिला (Chikhali Dog Attack)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00