Home माझं पिंपरी चिंचवड Maharashtra Rickshaw Panchayat:टू -व्हीलर टॅक्सीला विरोध; रिक्षा पंचायतचे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत स्थगित

Maharashtra Rickshaw Panchayat:टू -व्हीलर टॅक्सीला विरोध; रिक्षा पंचायतचे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत स्थगित

टू-व्हीलर टॅक्सी, ‘पिंक रिक्षा’ योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे पिंपरी आरटीओबाहेर आंदोलन; १५ ऑगस्टपर्यंत स्थगित.

by Admin
Spread the love

पिंपरी : टू-व्हीलर टॅक्सीला विरोध, ‘पिंक रिक्षा’ योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी तसेच रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व विविध संघटनांच्या वतीने सोमवारी (१० ऑगस्ट) पिंपरी व पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात (Maharashtra Rickshaw Panchayat)आले.

 

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची आरटीओ प्रशासनाने दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्या उपस्थितीत दोन तासांहून अधिक काळ झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा (Maharashtra Rickshaw Panchayat)झाली.

 

आरटीओ स्तरावरील प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच टू-व्हीलर टॅक्सी, ‘पिंक रिक्षा’ निविदा आणि वाहन सेवा पुरवठादारांच्या धोरणासंदर्भातील शासनस्तरीय प्रश्न वरिष्ठांकडे आणि शासनाकडे पाठविण्याचे (Maharashtra Rickshaw Panchayat)ठरले.

 

या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत स्थगित केले आहे. या कालावधीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ ऑगस्टनंतर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला (Maharashtra Rickshaw Panchayat)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00