(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बापू दिनकर कातळे यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली (Bapu Dinkar Katale)आहे.
बापू कातळे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आजही वीजपुरवठा सुरळीत सुरू होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. महावितरणचा नियोजनशून्य आणि निष्काळजी कारभार यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे घरगुती, व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद (Bapu Dinkar Katale)केले.
कातळे यांनी सांगितले की, ही समस्या तात्पुरती नसून तिच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा सुरू असून, लवकरच या गंभीर प्रश्नावर पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार (Bapu Dinkar Katale)आहे.
महावितरणने तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट (Bapu Dinkar Katale)केले.
यावेळी बापू दिनकर कातळे यांनी परिसरातील नागरिकांना एकत्र येऊन या लढ्यात साथ देण्याचे आवाहन केले. “हा केवळ वीजेचा प्रश्न नसून नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे. कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे,” असे त्यांनी (Bapu Dinkar Katale)म्हटले .
महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अद्याप कोणतीही निश्चित वेळ जाहीर करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बापू कातळे यांच्या भूमिकेमुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात(Bapu Dinkar Katale) आहे.
