Home मनोरंजन Dr Babasaheb Ambedkar Jayanti:डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नि: श्वास चंदनाचे’ कवी संमेलन उत्साहात

Dr Babasaheb Ambedkar Jayanti:डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नि: श्वास चंदनाचे’ कवी संमेलन उत्साहात

एफटीआयआय पुणे अंतर्गत रेडिओ एफटीआयआय 90.4 FM वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ‘नि: श्वास चंदनाचे’ कवी संमेलन उत्साहात पार पडले. अनेक कवींचा सहभाग.

by Admin
Spread the love

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्य ज्ञान दिनानिमित्त फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), पुणे अंतर्गत रेडिओ एफटीआयआय ९०.४ एफ.एम.वर आयोजित ‘नि: श्वास चंदनाचे…!’ या विशेष कवी संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) पडला.

 

या वेळी एफटीआयआयच्या कार्यक्रम निर्देशिका नीता तुपारे म्हणाल्या की, “समाजाला एकत्र बांधण्याचे सामर्थ्य कवितेत आहे. त्यामुळे प्रत्येक कवीने कवितेचे जतन करणे आवश्यक आहे.” संघर्षमय जीवनात कविता हरवत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कवी संमेलनातून कवींना प्रोत्साहन देत एफटीआयआय सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी( Dr Babasaheb Ambedkar Jayanti) सांगितले.

 

कार्यक्रमासाठी रेडिओ एफटीआयआयचे प्रभारी विश्वास नेर्लेकर, स्टेशन मॅनेजर अनुराधा वजिरे आणि निर्देशिका नीता तुपारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण पूर्ण झाले असून लवकरच त्याचे प्रसारण होणार (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी डॉ. जयद्रथ आखाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी, निवेदक व पत्रकार किशोर केदारी यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य सूत्रधार, अभिनेते व दिग्दर्शक अशोक वाघमारे यांनी (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) केले

 

कवी संमेलनात डॉ. जयद्रथ आखाडे (संविधान व राष्ट्रनिर्मिती), अशोक वाघमारे (दरवळ चंदनाचा, भाग्यविधाता), अशोक सोनवणे (विश्वरत्न डॉ. आंबेडकर, धम्म), सुवर्णा पवार (एक दिवा लावा भीमरावांच्या नावा, शिल्पकार), उमेंद्र बीसेन (उपकार भीमाचे, लढाई स्वाभिमानाची), उज्वला दहिवले (बा भीमा, फिटणार नाही उपकार), सुनिता घोडके (रमा भीमाचे गुणगान, माझे बाबा), अरुण घोडके (निखारा, मानाचा मुजरा) आणि राजेश चौधरी (जागर महामानवाचा, जागर शिक्षणाचा) यांनी आपल्या कविता सादर( Dr Babasaheb Ambedkar Jayanti)केल्या.

 

तसेच ज्येष्ठ कवी, निवेदक व पत्रकार अमित उर्फ किशोर केदारी यांनी ‘डॉ. भिमराव आंबेडकर’ व ‘समानता’ या ओजस्वी रचना सादर करून कार्यक्रमात विशेष रंग (Dr Babasaheb Ambedkar Jayanti)भरला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00