पिंपरी ते निगडीदरम्यान सुरू असलेल्या पुणे मेट्रोच्या कामादरम्यान शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना टळल्याची घटना घडली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या शेडचे पत्रे उडून थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कोसळले. त्यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण (Nigdi Metro News) झाले.
माहितीनुसार, मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी उन्हापासून संरक्षणासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे हे पत्रे उखडून रस्त्यावर फेकले गेले. त्यावेळी महामार्गावरून अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने ये-जा करत (Nigdi Metro News)होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलवर बोलत जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासमोर अचानक मोठा पत्रा येऊन आदळला. हा प्रकार इतका अचानक घडला की चालक काही क्षणांसाठी घाबरून गेला. सुदैवाने काही सेकंदांचा फरक पडल्याने मोठा अपघात टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली (Nigdi Metro News)नाही.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पुणे मेट्रो प्रशासनाच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर नाराजी व्यक्त केली. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला (Nigdi Metro News)आहे.
दरम्यान, रस्त्यावर पत्रे पडल्यामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ पत्रे हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेबाबत पुणे मेट्रो प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली (Nigdi Metro News)नाही.
