Home आरोग्य Pawna Dam Discharge:पवना धरणातून विसर्ग वाढणार; 9 हजार ते 12 हजार क्युसेकपर्यंत वाढीची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pawna Dam Discharge:पवना धरणातून विसर्ग वाढणार; 9 हजार ते 12 हजार क्युसेकपर्यंत वाढीची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पवना धरण 97 टक्के भरल्याने नदीपात्रातील विसर्ग 7,550 वरून 9,000 क्युसेक करण्यात येणार असून तो 12,000 क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

by Admin
Spread the love

पिंपरी : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला (Pawna Dam Discharge)आहे.

रविवार (26 जुलै) दुपारी 2 वाजेपर्यंत पवना नदीपात्रात 7,550 क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवून 9,000 क्युसेक करण्यात येणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी आवक लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने 12,000 क्युसेकपर्यंत वाढविण्याची दाट शक्यता असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांनी दिली (Pawna Dam Discharge)आहे.

सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे पवना नदीच्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले (Pawna Dam Discharge)आहे.

नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले(Pawna Dam Discharge) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00