Home गुन्हे Pimpri Gambling Raid:पिंपरी-चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; सात जणांवर गुन्हा दाखल

Pimpri Gambling Raid:पिंपरी-चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; सात जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगर परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत 7 जणांना रंगेहाथ पकडले. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा =Pimpri Gambling Raid) दाखल.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : संत तुकारामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ४ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नवीन फुलेनगर परिसरातील मोकळ्या मैदानात करण्यात (Pimpri Gambling Raid) आली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी आर्थिक फायद्यासाठी एकत्र येऊन पैशांवर जुगार खेळत होते. याबाबत गुप्त माहिती मिळताच संत तुकारामनगर पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकत सर्वांना रंगेहाथ (Pimpri Gambling Raid)पकडले.

 

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रतिक बाळकृष्ण बगाटे (वय २८), अमित दिलीप गायकवाड (वय २७), किरण मारुती कांबळे (वय ३८), पंकज भगवान ओव्हाळ (वय ३४), दत्ता रवी हजारे (वय २२), रोहित प्रभाकर शिंदे (वय २५) आणि सूरज विजय घोडके (वय ३४) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पिंपरी परिसरातील विविध भागातील रहिवासी (Pimpri Gambling Raid)आहेत.

 

पोलिसांनी आरोपींकडून जुगाराचे साहित्य जप्त केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला (Pimpri Gambling Raid)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00