आळंदी : मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा शुभारंभ सोहळा शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आला (Vishvamangal Marathi Foundation) आहे.
‘झेंडा मराठीचा… मराठी भाषेचा… मराठी कर्तृत्वाचा…’ या घोषवाक्याखाली मराठी शाळांचे पुनरुज्जीवन, भाषा-संस्कृतीचा प्रसार तसेच मराठी उद्योजकांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे (Vishvamangal Marathi Foundation) सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आ. सुभाष बापू देशमुख उपस्थित राहणार आहेत. तर ज्येष्ठ निरुपणकार व प्रख्यात वक्ते विवेकजी घळसासी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उद्योजकीय परिसंवादात डॉ. संजय वायाळ, अप्पासाहेब कोठारे (दुबई) आणि उदय भोसले (लंडन) सहभागी होणार (Vishvamangal Marathi Foundation) आहेत.
मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणाऱ्या या नव्या उपक्रमाबद्दल विविध स्तरांत उत्सुकता व्यक्त होत (Vishvamangal Marathi Foundation) आहे.
