Home गुन्हे Dehuroad Firing:देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; उपचारापूर्वी मृत्यू

Dehuroad Firing:देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; उपचारापूर्वी मृत्यू

देहूरोडमध्ये भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

by Admin
Spread the love

देहूरोड : देहूरोड परिसरात भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित (Dehuroad Firing) केले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सवाना चौक परिसरात हल्लेखोरांनी रमेश रेड्डी यांच्यावर सलग गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले(Dehuroad Firing) होते.

 

घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी सांगितले की, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू (Dehuroad Firing) आहे.

 

दरम्यान, घटनेनंतर नातेवाईक व समर्थकांनी रुग्णालयात आक्रोश व्यक्त केला. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने देहूरोड बाजारातील काही दुकाने बंद ठेवण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला(Dehuroad Firing) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00