पिंपरी, दि. २६ जानेवारी २०२६ :भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण समारंभात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात (Municipal Corporation Event)आला.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शहरवासियांना शुभेच्छा देताना अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, “भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीस ७७ वर्षे पूर्ण होत असून हा दिवस आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानिक आदर्शांचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या अखंड प्रवासाचा गौरव आहे. या पावन प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक (Municipal Corporation Event) शुभेच्छा.”
ते पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ई-प्रशासन आणि सांस्कृतिक क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे शहराने देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. करप्रणाली अधिक सुलभ व पारदर्शक झाल्यानंतर नागरिकांनी मिळकतकर वेळेत भरून प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले आहे. याबद्दल सर्व करदात्यांचे त्यांनी आभार मानले असून, उर्वरित नागरिकांनीही वेळेत कर भरून शहराच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन(Municipal Corporation Event) केले.
या ध्वजारोहण समारंभास माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य मंदार देशपांडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, आशा सूर्यवंशी, मधुरा शिंदे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नगरसचिव मुकेश कोळप, उपआयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी(Municipal Corporation Event) केले.
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर व विक्रांत बगाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात (Municipal Corporation Event)आला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन
प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तकेंद्राच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
• भारतीय संविधानाच्या मूल्यांवर आधारित लोकशाही प्रवासाला ७७ वर्षे पूर्ण
• पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक, सांस्कृतिक व नागरी विकासातील महत्त्वपूर्ण वाटचाल
• स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये राज्यात प्रथम व देशात सातवा क्रमांक
• आरोग्य सेवा रँकिंगमध्ये सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक
• ‘पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे शहराची जागतिक ओळख
• महापालिका शाळांमधून गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षणावर भर
• महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी
• अमृत योजना, नदी पुनरुज्जीवन व पर्यावरणपूरक पायाभूत प्रकल्प
• मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रशासन कटिबद्ध
• नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसोबत समन्वयातून शहरविकासाचा संकल्प
• निवडणूक काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक
