प्रतिनिधी :प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी इंडियन म्युझिकल क्लबच्या वतीने ‘ये दिल हैं हिंदुस्तानी’ या देशभक्तिपर गीतांच्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीचे आयोजन निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (छोट्या) नाट्यगृहात करण्यात आले. या कार्यक्रमात देशभक्तीच्या सुरेल गीतांनी श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध (Indian Musical Club)झाले.
राखी झोपे यांच्या संकल्पनेतून आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून ‘गाता रहे मेरा दिल’ या उपक्रमांतर्गत सादर झालेली ही ४५ वी विशेष सांगीतिक मैफल होती. देशभक्तीचा परिपोष साधण्यासाठी कलाकारांनी मनगटावर तिरंगी रिस्टबँड परिधान करून सादरीकरण केले. राजकुमार सुंठवाल, प्रमोद शर्मा, गणेश ओहाळ, सागर पाटील, शहाजी कांबळे, मंगेश उंबराणी, अमित पांचाळ, नीलेश मोरे, दत्तात्रय कुंभार, कविता शाह, माधवी पोतदार, रूपाली मिरासदार, प्रशांत कुलकर्णी आणि दीपा कोंडलेकर या गायक कलाकारांनी एकल तसेच युगुलस्वरात देशभक्तिपर गीतांचे अत्यंत सुरेल सादरीकरण केले. बहुतांश गीतांना दमदार कोरसची स्वरसाथ लाभली, ज्यामुळे मैफलीला अधिक उंची प्राप्त (Indian Musical Club) झाली.
‘संदेसे आते हैं…’, ‘जहाँ डाल-डाल पर…’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी…’, ‘मेरा जूता है जापानी…’, ‘मेरे प्यारे वतन…’, ‘कितना सोना है देश मेरा…’, ‘भारत हमको जान से प्यारा है…’, ‘हर करम अपना करेंगे…’, ‘ये देश है वीर जवानों का…’, ‘मेरे देश की धरती…’, ‘इन्साफ की डगर पे…’, ‘मेरे देशप्रेमियों…’, ‘ए मेरे वतन के लोगों…’, ‘छोड़ो कल की बातें…’, ‘कर चले हम फ़िदा…’, ‘देश रंगीला…’, ‘है प्रीत जहाँ की रीत सदा…’, ‘दुल्हन चली…’, ‘चिठ्ठी आई है…’ अशा वैविध्यपूर्ण गीतांनी रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि *‘वन्स मोअर’*च्या मागणीसह उत्स्फूर्त दाद दिली. ‘भारतमाता की जय!’ या घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून(Indian Musical Club) गेले.
मराठी गीतांमध्ये ‘ने मजसी ने मजला…’ आणि ‘शूर आम्ही सरदार…’ या गीतांनी श्रोत्यांना विशेष भावविवश केले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना ‘जिंदगी मौत ना बन जाये…’ या वीरश्रीपूर्ण गीताने मैफलीचा प्रभावी समारोप करण्यात आला, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सांगता (Indian Musical Club)झाली.
कार्यक्रमादरम्यान मणिपूर येथील एका बेटावरील तरंगत्या गावासाठी मदतनिधी संकलनाचे आवाहन करण्यात आले, ज्याला उपस्थित रसिकांनी उदंड प्रतिसाद(Indian Musical Club) दिला.
कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन म्युझिक व्हिजन यांनी केले, दृकश्राव्य चित्रण विक्रम क्रिएशन्स यांनी केले, तर छायाचित्रण आकाश गाजूल यांनी केले. अभ्यासपूर्ण व ओघवते निवेदन मनीष गोखले यांनी (Indian Musical Club)केले.
