Home माझं पिंपरी चिंचवड Pankaja Munde:पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांचीविमल गार्डन, रहाटणी येथे जाहीर सभा

Pankaja Munde:पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांचीविमल गार्डन, रहाटणी येथे जाहीर सभा

पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील विमल गार्डन येथे ९ जानेवारी २०२६ रोजी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची भाजप व आरपीआय (आ.) उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) :आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मित्रपक्षाच्या वतीने प्रचाराचा जोर वाढविण्यात आला असून, याच अनुषंगाने शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता रहाटणी येथील विमल गार्डन येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात (Pankaja Munde) आले आहे.

या जाहीर सभेस राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून, प्रभाग क्रमांक २२ व २७ मधील भाजप + आर.पी.आय. (आ.) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली (Pankaja Munde)आहे.

या सभेमध्ये मा. पंकजाताई मुंडे राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजना, पर्यावरण संवर्धन, पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने घेतलेले निर्णय याबाबत मतदारांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक विकासकामे, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर त्या आपले स्पष्ट मत मांडणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले (Pankaja Munde) आहे.

प्रभाग क्रमांक २२ व २७ मधील विकासासाठी भाजप-आर.पी.आय. (आ.) आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या सभेत करण्यात येणार असून, परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला(Pankaja Munde) आहे.

या जाहीर सभेमुळे रहाटणी व परिसरातील राजकीय वातावरणात चांगलीच रंगत निर्माण झाली असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले(Pankaja Munde) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00