पिंपरी-चिंचवड : तेलंगणा राज्यातील महेबूबनगर येथे होणाऱ्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी कु. वेदांत संदीप कानपिळे याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण (Vedant Kanpile) आहे.
शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेदांत कानपिळे याचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या हस्ते पार (Vedant Kanpile)पडला.
या वेळी असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, सदस्य डॉ. मृदुला महाजन, क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे व ऐश्वर्या साठे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी वेदांतचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा (Vedant Kanpile) दिल्या.
छायाचित्रात वेदांत कानपिळे याचा सत्कार करताना पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, सौ. रुपाली कानपिळे व सदस्य डॉ. मृदुला महाजन दिसत (Vedant Kanpile) आहेत.
