Home पुणे River Cyclothon 2025:पुनःश्च विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल : ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’साठी तब्बल २५ हजार सायकलपटूंची नोंदणी पूर्ण

River Cyclothon 2025:पुनःश्च विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल : ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’साठी तब्बल २५ हजार सायकलपटूंची नोंदणी पूर्ण

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी :

इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, डुडूळगाव–मोशी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सायक्लोथॉनसाठी २५ हजारांहून  ( River Cyclothon 2025)
अधिक सहभागी नोंदले गेले आहेत.

आणखी केवळ ५ दिवस शिल्लक असताना नोंदणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.

मोशीतील नव्या स्थळी पहिल्यांदाच आयोजन — विक्रमी गर्दीची अपेक्षा

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी भोसरी गावजत्रा मैदानावर होणारा हा उपक्रम यंदा प्रथमच मोशीतील अधिक प्रशस्त आणि आधुनिक स्थळी आयोजित करण्यात आला आहे.
पुणे–नाशिक महामार्गालगतची ही जागा मोठ्या संख्येने सायकलपटूंसाठी अत्यंत सोयीस्कर असून, आयोजकांनी यंदा ३५ हजारांहून अधिक सहभागाचा (River Cyclothon 2025)
अंदाज वर्तवला आहे.

गतवर्षी या सायक्लोथॉनने ‘जगातील सर्वांत लांब सायकल रांग’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती.
आता पुन्हा एकदा नवा विश्वविक्रम घडवण्याच्या दिशेने उपक्रम जोमाने पुढे सरसावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

पर्यावरण, आरोग्य आणि नदी स्वच्छतेचा संदेश — उपक्रम अंतिम टप्प्यात

या उपक्रमाचे संयुक्त आयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांमध्ये आरोग्यजागृती हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
सायक्लोथॉनच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात नियोजन, सुरक्षा, मार्गव्यवस्था आणि सहभागींच्या सुविधा यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

प्रतिक्रिया : डॉ. निलेश लोंढे

“२५ हजार सायकलपटूंच्या सहभागाने रिव्हर सायक्लोथॉनसाठी निर्माण झालेला उत्साह खरोखर प्रेरणादायी आहे. पुढील पाच दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन इंद्रायणी नदी, पर्यावरण आणि भावी पिढ्यांसाठी हा उपक्रम जगापर्यंत पोहोचवावा. मोशीतील नव्या ठिकाणी सर्व सुविधा, सुरक्षा आणि पार्किंगची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे. चला, नदीसाठी आणि निसर्गासाठी पुन्हा एकदा इतिहास  (River Cyclothon 2025)
घडवूया.”

— डॉ. निलेश लोंढे, मुख्य समन्वयक, रिव्हर सायक्लोथॉन 2025

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00