माननीय आयुक्त साहेब,
डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरीचिंचवड मनपा
सप्रेम नमस्कार.
अलीकडे आपण पिंपरी-चिंचवड शहराच्या ओळखीबाबत केलेले वक्तव्य वाचनात आले. “या शहराची ओळख कुठेच नाही” असे सूचक विधान ऐकून खरोखरच खेद व आश्चर्य वाटले. आपण अनुभवी व जबाबदार प्रशासकीय अधिकारी असूनही असे विधान करणे, शहरातील नागरिकांच्या भावना दुखावणारे ठरले (PCMC Commissioner controversy)आहे.
साहेब, ज्या पवित्र भूमीला महासंत मोरया गोसावी यांचा पावन स्पर्श लाभला, जिथे संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी आणि ज्ञानेश्वर माऊलींची वैराग्य परंपरा आजही जिवंत आहे, त्या शहराची ओळख नाही असे म्हणणे इतिहास व संस्कृतीकडे दुर्लक्ष करणारे आहे. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, धार्मिक व सांस्कृतिक वारसा, तसेच सामाजिक एकात्मता यामुळे पिंपरी-चिंचवडची ओळख केवळ स्थानिक नाही, तर राज्य आणि देशपातळीवरही दृढ(PCMC Commissioner controversy) आहे.
याशिवाय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील मानाची व प्रतिष्ठित महापालिका म्हणून ओळखली जाते. अनेक कुशल व वरिष्ठ अधिकारी येथे पोस्टिंग मिळावी म्हणून प्रयत्न करतात, हे वास्तव आपल्यालाही ठाऊक( PCMC Commissioner controversy)असेलच.
संपूर्ण भारतीय जनतेसाठी ‘उद्योगरत्न’ म्हणून चिरपरिचित असलेले रतन टाटा यांनीही आपल्या उद्योगसमूहाची यशस्वी आणि तेजस्वी वाटचाल या भूमीशी जोडलेली (PCMC Commissioner controversy)आहे.
“स्कूटर म्हणजे बजाज… हमारा बजाज” अशी देशभर ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचेही या शहराशी घट्ट नाते(PCMC Commissioner controversy) होते.
इतकेच नव्हे, तर आजच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाचा भावी चेहरा म्हणून ज्याच्याकडे अपेक्षेने पाहिले जाते, तो युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हाही याच मातीतला(PCMC Commissioner controversy) आहे.
उद्योग, क्रीडा, संस्कृती, अध्यात्म अशा प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या या शहराची ओळख नाही असे म्हणणे वास्तवाला धरून नाही. उलट, पिंपरी-चिंचवड ही विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी समृद्ध झालेली, प्रगती आणि परंपरेचा सुंदर संगम असलेली नगरी(PCMC Commissioner controversy) आहे.
किती उदाहरणे द्यावीत? इतिहास, उद्योगविश्व, क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरा—सर्वच अंगांनी हे शहर स्वतःची ठळक आणि अभिमानास्पद ओळख निर्माण करून उभे (PCMC Commissioner controversy)आहे.
आपल्या वक्तव्यामुळे समस्त पिंपरी-चिंचवडकरांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, शहराच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. तथापि, “चुकतो तो माणूस” या विचारावर आमचा ठाम विश्वास आहे. चूक लक्षात आल्यास मोठ्या मनाने ती मान्य करून माफी मागणे, हीच खरी मोठेपणाची खूण( PCMC Commissioner controversy)आहे.
म्हणूनच आपण आपल्या वक्तव्याचा पुनर्विचार करून, नागरिकांची माफी मागावी आणि हा विषय अधिक वाढू न देता सकारात्मक मार्गाने पुढे न्यावा, ही नम्र (PCMC Commissioner controversy)विनंती.
आपला विश्वासू,
विवेक कुलकर्णी
संपादक
माझं पिंपरी-चिंचवड.इन
