Home गुन्हे PCMC Cyber Fraud :पिंपरीत आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश; IPO गुंतवणुकीच्या नावाखाली सव्वा दोन कोटींची फसवणूक

PCMC Cyber Fraud :पिंपरीत आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश; IPO गुंतवणुकीच्या नावाखाली सव्वा दोन कोटींची फसवणूक

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी IPO व शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली 2.09 कोटींची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. तीन आरोपी अटकेत, 62 लाख रुपये होल्ड.

by Admin
Spread the love

पिंपरी (प्रतिनिधी) : शेअर मार्केट व IPO मध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवत सुमारे २ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर टीमने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट बँकॉक व म्यानमारमधील कुप्रसिद्ध सायबर कॉल सेंटरपर्यंत पोहोचले (PCMC Cyber Fraud) आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लेसमेंट व इंटर्नशिप सुविधा देणाऱ्या एका कंपनीच्या मालकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. विविध कारणे सांगत आरोपींनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपये उकळले. अपेक्षित परतावा न मिळाल्याने संबंधित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल(PCMC Cyber Fraud) केली.

 

तपासादरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडियातील एका संशयास्पद खात्याचा माग काढण्यात आला. ‘आर्शिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने नवी मुंबईत उघडलेल्या या खात्याच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तुर्भे परिसरातून सुशील भगवान जुवाटकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे खाते आपल्या साथीदार पंकज राज कपूर व निश्चल टंकबीर बरेयली यांच्या सांगण्यावरून उघडल्याची कबुली(PCMC Cyber Fraud) दिली.

 

पुढील तपासात समोर आले की, पंकज कपूर व निश्चल बरेयली यांनी यापूर्वी बँकॉक आणि म्यानमारमधील सायबर फसवणूक कॉल सेंटर्समध्ये काम केले होते. त्याच अनुभवाच्या जोरावर नवी मुंबईत नवीन कॉल सेंटर सुरू करण्याचा त्यांचा डाव (PCMC Cyber Fraud) होता.

 

या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ६ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २४ विविध बँक खात्यांचे किट्स, १२ बनावट शिक्के आणि २ हार्डडिस्क असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करत फिर्यादीचे ६२ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये होल्ड करण्यात यश मिळवले (PCMC Cyber Fraud) आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व त्यांचे पथक करत(PCMC Cyber Fraud) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00