Home संस्कृती Marathi Language Day:शाहूनगरात ‘माय मराठी’चा जागर; मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Marathi Language Day:शाहूनगरात ‘माय मराठी’चा जागर; मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

शाहूनगरातील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविसंमेलन, नगरसेवक सत्कार व निबंध स्पर्धा पार पडली.

by Admin
Spread the love

शाहूनगर, दि. २७ फेब्रुवारी :शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. शाहूनगर–संभाजीनगर रस्त्यावरील शिव-शाहू-संभाजी उद्यान येथे आयोजित विविध कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘माय मराठी’चा जागर (Marathi Language Day)  केला.

या निमित्ताने “माय मराठी” कविसंमेलन, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव समारंभ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मराठी भाषेचा अभिमान जागवणारा हा सोहळा साहित्यप्रेमींसाठी अविस्मरणीय (Marathi Language Day) ठरला.

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी पाठ्यपुस्तकातील कवयित्री संगीता झिंजुरके होत्या. प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, विलास जेऊरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी (Marathi Language Day)  केले.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक तुषारभाऊ हिंगे, अनुराधाताई गोरखे, सुप्रिया ताई चांदगुडे व कुशाग्र कदम यांचा सत्कार करण्यात आला.कविसंमेलनात प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, मानसी चिटणीस, प्रदीप गांधलीकर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, सीमा गांधी, सुहास घुमरे, पितांबर लोहार, कांचन नेवे, सुनंदा शिंगनाथ, रेणुका हजारे आदी कवींनी विविध काव्यप्रकारांतून मराठी भाषेची महती अधोरेखित केली. विद्यार्थी संग्राम उदय पाटील यांनी सादर केलेल्या मराठी भाषेच्या पोवाड्याने कार्यक्रमाला विशेष रंगत (Marathi Language Day)  आणली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात (Marathi Language Day)  आला.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी ओघवत्या व प्रवाही शैलीत केले, तर इतर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन गणेश सहाणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाचनालयाचे सचिव राजाराम वंजारी यांनी (Marathi Language Day)  केले.

या प्रसंगी अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे, संचालक भरत गायकवाड, राजू रायकर, गणेश सहाणे, मनीषा पाटील, गोपाळ सैधाने, नरेंद्र जयसिंगपुरे तसेच ग्रंथालय कर्मचारी रवींद्र अडसूळ, तेजश्री घेवारी आणि अनिता पाटील उपस्थित (Marathi Language Day)  होते.

परिसरातील नागरिक, साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. मराठी भाषा संवर्धनाचा संदेश देत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न (Marathi Language Day)  झाला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00