पिंपरी-चिंचवड, दि. २८ फेब्रुवारी २०२६ :पिंपरी-चिंचवडमधील Nashik Phata परिसरात वाहतूक कारवाईदरम्यान एका ८० वर्षीय ज्येष्ठ शिख नागरिकाला कथितरीत्या अपमानास्पद वागणूक देत धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजता घडल्याची माहिती आहे. संबंधित नागरिक सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते असल्याचे सांगितले (Nashik Phata) जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, ते आपल्या वाहनाची विमा पॉलिसी काढण्यासाठी नाशिक फाटा चौकाजवळील गॅरेज व विमा कार्यालयाकडे जात असताना कर्तव्यावरील ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन थांबवले. मात्र, केवळ तपासणी न करता एका वार्डनकडून उद्धट भाषेत बोलणे व “डबल दंड लावू” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर “हा ट्रॅफिक वार्डन की गुंड?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात (Nashik Phata)आहे.
गणवेश व ‘बॉडी कॅम’वर प्रश्न
घटनेवेळी संबंधित पोलीस हवालदार पूर्ण गणवेशात नव्हते (टोपी नसल्याचा आरोप) तसेच त्यांच्या अंगावर अनिवार्य असलेला बॉडी कॅमेरा नव्हता, असे सांगितले जाते. त्यामुळे कारवाईची पारदर्शकता आणि वैधता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्वतःची ओळख ‘Zero Traffic Warden’ म्हणून सांगणाऱ्या सोहेल पठाण यांनी कथितरीत्या अरे-तुरेची भाषा वापरत ज्येष्ठ नागरिकांशी आक्रमक वर्तन केले. परिस्थिती चिघळू नये म्हणून उपस्थित हवालदाराला हस्तक्षेप करावा लागल्याचेही साक्षीदारांचे म्हणणे (Nashik Phata) आहे.
दंड आकारणी अधिकारांबाबत संभ्रम
कायदेशीर तरतुदीनुसार, ई-चलानद्वारे दंड आकारण्याचा अधिकार अधिकृत पोलीस अधिकाऱ्यांनाच (PSI/ASI किंवा विशेष आदेश असलेले अधिकारी) असतो. मात्र, महापालिकेकडून नियुक्त वार्डनचा दंड प्रक्रियेत सहभाग दिसून आल्याने अधिकारांच्या मर्यादांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित मशीन कोणाच्या नावावर नोंदणीकृत आहे आणि तिचा ताबा वार्डनकडे कसा होता, याची चौकशी होण्याची मागणी होत (Nashik Phata) आहे.
नागरिकांचे टोकदार सवाल
कारवाईदरम्यान बॉडी कॅमेरा का वापरण्यात आला नाही?
संबंधित हवालदार पूर्ण गणवेशात का नव्हते?
‘Zero Traffic Warden’ची नेमणूक कोणत्या आदेशाखाली झाली?
वार्डनला दंड प्रक्रियेत हस्तक्षेपाचा अधिकार आहे का?
प्रमुख मागण्या
1. संबंधित हवालदार व Zero Traffic Warden सोहेल पठाण यांना चौकशीपर्यंत निलंबित करावे.
2. घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी.
3. नाशिक फाटा परिसरातील CCTV फुटेज तात्काळ जतन करावे.
4. वाहतूक अंमलबजावणीदरम्यान सर्व कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅमेरा बंधनकारक करावा.
5. ट्रॅफिक वार्डन नेमणूक प्रक्रिया व अधिकार सार्वजनिक करावेत.
या प्रकरणामुळे Pimpri-Chinchwad येथील वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पोलीस प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी नागरिकांकडून होत(Nashik Phata) आहे.
