पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :गुन्हे शाखा युनिट–१ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या एका तासात शिताफीने कारवाई करत वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना अटक केली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य गुन्हे करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश झाला (Crime News) आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–१चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग व त्यांचे सहकारी अधिकारी-कर्मचारी बस स्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत (Crime News)होते.
दरम्यान, निगडी बस स्थानकाजवळील मधुकर पवळे उड्डाणपूल परिसरात तीन महिला एका वयोवृद्ध महिलेचे गळ्यातील सोने चोरून पळून जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस शिपाई चिखलकर यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित महिलांना महिला पोलीस हवालदारांच्या मदतीने शिताफीने ताब्यात (Crime News) घेतले.
