प्राधिकरण, निगडी व आकुर्डी परिसरात आज सकाळी ९ ते दुपारी २ या सुमारे चार तासांच्या कालावधीत वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सकाळी कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गासह व्यापारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या ‘लाईटच्या खेळखंडोब्या’चा (Nigdi power cut)फटका बसला.
सामाजिक कार्यकर्ते सुभाष राणे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, थंडीच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांना गरम पाण्याने अंघोळ करता आली नाही. परिणामी नागरिकांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागली, ज्याचा विशेष त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा(Nigdi power cut) लागला.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डकडे (एमएसईबी) वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. कोणताही हंगाम असो—उन्हाळा, पावसाळा किंवा थंडी—निगडी परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून व्यवसाय, आरोग्य आणि शिक्षणावरही परिणाम होत (Nigdi power cut)आहे.
या समस्येवर तातडीने स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही सुभाष राणे यांनी दिला(Nigdi power cut )आहे.
सोनल शिंदे (सहाय्यक अभियंता, एमएसईडीसीएल)
“तांत्रिक कारणांमुळे टेस्टिंग करणारी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाला. बिघाड दूर केल्यानंतर तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.”
सुभाष राणे (सामाजिक कार्यकर्ते)
“महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डने टेस्टिंग करणाऱ्या यंत्रणांची संख्या वाढवण्याची नितांत गरज आहे. अनेकदा एकाच वेळी दोन-तीन ठिकाणी अंडरग्राउंड केबल बस्ट होते. अशा वेळी उपलब्ध यंत्रणा अपुऱ्या पडतात. जोपर्यंत या यंत्रणांची संख्या वाढवली जात नाही, तोपर्यंत हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही.”
