Home तंत्रज्ञान Maha Metro :Pune Metroच्या तीन स्थानकांवर नवे प्रवेशद्वार; प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ

Maha Metro :Pune Metroच्या तीन स्थानकांवर नवे प्रवेशद्वार; प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ

Pune Metro प्रशासनाने पिंपरी-चिंचवड मनपा, स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकांवर १४ फेब्रुवारी २०२६ पासून नवी प्रवेशद्वारे सुरू केली. प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची गरज नाही; सुरक्षित व जलद प्रवासाला चालना.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ (Pune)आणि वेळेची बचत करणारा व्हावा या उद्देशाने पुणे मेट्रो प्रशासनाने तीन महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ पासून पिंपरी-चिंचवड मनपा, स्वारगेट आणि शिवाजीनगर या स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार (Maha Metro) आहेत.

या सुविधेमुळे प्रवाशांना वर्दळीचे रस्ते ओलांडण्याची गरज भासणार नाही. परिणामी, वेळ आणि श्रमांची बचत होऊन सुरक्षेतही वाढ होणार (Maha Metro) आहे

 

नवीन प्रवेशद्वारांचा तपशील आणि ठळक वैशिष्ट्ये:

१. पिंपरी चिंचवड मनपा मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र ३):

हे प्रवेशद्वार पुणे-मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. या प्रवेशद्वारामुळे पिंपरी शहरातून येणाऱ्या व स्थानकातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडावा लागणार नाही. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांनाही याचा लाभ होणार (Maha Metro)आहे.

२. स्वारगेट मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ५):

हे नवीन भुयारी प्रवेशद्वार एमएसआरटीसी (एसटी) बसस्थानकाच्या बाजूला सुरू होत आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकात प्रवेश मिळणार आहे. स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, जेधे चौक ओलांडण्यासाठी मुख्य रस्त्यावर येण्याची गरज उरणार (Maha Metro)नाही.

३. शिवाजीनगर मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ३):

आकाशवाणी केंद्राजवळील शिमला ऑफिस चौकात हे भुयारी प्रवेशद्वार उघडण्यात येत आहे. गणेशखिंड रस्ता आणि कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचणे सुलभ होणार आहे. मुख्य रस्त्याशी थेट जोडणी मिळाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, वाढती प्रवासी संख्या आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यालगत प्रवास करणाऱ्या नागरिकांना या नव्या प्रवेशद्वारांचा मोठा फायदा होणार आहे.या निर्णयामुळे पुणे मेट्रोचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि प्रवाशाभिमुख होणार असल्याचे स्पष्ट झाले (Maha Metro)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00