Home माझं पिंपरी चिंचवड Rajgauda Anaa :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजगोंडा अण्णा पाटील यांचे निधन

Rajgauda Anaa :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजगोंडा अण्णा पाटील यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजगोंडा अण्णा पाटील यांचे निधन

by Admin
Spread the love

शाहूनगर, दि. ८ मार्च :शाहूनगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजगोंडा अण्णा पाटील (वय ७३) यांचे असाध्य आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शाहूनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात (Rajgauda Anaa) आहे.

राजगोंडा अण्णा पाटील यांनी आयुष्यभर सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले होते. विशेषतः शाहूनगर, रुपीनगर आणि संभाजीनगर या परिसरात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि तरुण पिढी ज्ञानाच्या प्रवाहाशी जोडली जावी, या उद्देशाने त्यांनी अनेक उपक्रम(Rajgauda Anaa) राबवले.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील अग्रगण्य अशा श्री शाहू वाचनालयाचे ते संस्थापक विश्वस्त होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरात वाचन चळवळीला चालना मिळाली आणि अनेक नागरिक ग्रंथालयाशी जोडले (Rajgauda Anaa) गेले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार (Rajgauda Anaa) आहे.

त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा एक अभ्यासू, जिद्दी आणि वाचन संस्कृतीचा प्रचार करणारा कार्यकर्ता हरपल्याची भावना परिसरात व्यक्त होत (Rajgauda Anaa) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00