प्रतिनिधी :काही माणसं आपल्या नकळत आयुष्याचा भाग होतात. त्यांच्या जाण्याचं सत्य माहीत असूनही मन ते स्वीकारायला तयार नसतं. अशीच एक हुरहूर लावून जाणारी व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री, पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार, स्व. अजितदादा (Ajit Pawar memories) पवार.
लोकनेते म्हणून त्यांची ओळख ठळक होतीच; मात्र माणूस म्हणून, नातं जपणारा नेता म्हणून ते अधिक खोलवर मनात रुजले होते. अशाच काही हृदयस्पर्शी आठवणी जागवल्या आहेत लोकमतचे उपसंपादक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. विश्वास मोरे यांनी— खास माझंपिंपरीचिंचवड.इनच्या (Ajit Pawar memories)वाचकांसाठी.
नेते आणि पत्रकार : अंतर राखून जपलेलं नातं
नेते आणि पत्रकार यांचं नातं सहसा जवळचं असतं. मात्र अजितदादा याबाबतीत वेगळे होते. पत्रकारांशी फारशी जवळीक न ठेवणारा हा नेता होता, हे वास्तव आहे. गेली तीन दशके पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या राजकारणाचा जवळून साक्षीदार असतानाही, दादांचा पत्रकारांशी संवाद मर्यादितच (Ajit Pawar memories)राहिला.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जाणवणारा बदल स्पष्ट दिसू लागला. वरकरणी फटकळ वाटणारे दादा अधिक गोड, मिस्कील आणि संयमी होत गेले. वयासोबत आलेली परिपक्वता त्यांच्या बोलण्यात, वागण्यात उतरू लागली (Ajit Pawar memories)होती.
‘आख्यान’ आणि ‘व्याख्यान’ची गोष्ट
२००९ सालची आठवण. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात अजितदादांचे भाषण झाले. दिवसभरात पाच ठिकाणी एक-एक तासाची भाषणे, आणि प्रत्येक ठिकाणी विकासाचे तेच मुद्दे. त्यावर बातमी देताना मी ‘अजित पवारांचे आख्यान’ अशी चौकट वापरली.दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातलाच फोन आला—“हॅलो, अजित पवार बोलतोय… हे आख्यान काय असतं?”मी आख्यान-व्याख्यानाचा अर्थ समजावून सांगितला. त्यावर दादांचे उत्तर साधं होतं—आपण विकास केला आहे, तो सांगितला. त्यात वावगे काय?”मी त्यांना म्हटलं, “दादा, तुम्ही तुमचं काम करताय, आम्ही आमचं. माध्यमांकडे फार लक्ष देऊ नका.”फोन ठेवला गेला. बहुधा माझं म्हणणं त्यांना पटलं (Ajit Pawar memories)होतं.
आणि आयुक्तांनाही झापले…
डॉ. श्रीकर परदेशी आयुक्त असताना सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामविरोधी मोहिमेमुळे शहरातील राजकारण तापलं होतं. पीएमआरडीच्या इमारतीत नगरसेवक थेट दादांकडे तक्रारी घेऊन गेले. अधिकारी उपस्थित असतानाच दादांचा संताप उफाळून आला. नगरसेवकांवर येणारा ताण, लोकांचा रोष—सगळं ते परखड शब्दांत मांडत होते.दुसऱ्या दिवशी ‘अनधिकृत बांधकामांवरून खरडपट्टी’ अशी बातमी प्रसिद्ध झाली. सकाळी पुन्हा फोन—“काय बातमी देता रे… लोकांसाठी आम्ही बोलतो, त्यात चूक काय?”मी त्यांना स्पष्ट सांगितलं—“दादा, तुमची भूमिका बरोबर आहे, आमचीही. अधिकाऱ्यांना झापायला हवंच; त्याचा संदेश जाणं महत्त्वाचं आहे.”ते हसले. संवाद (Ajit Pawar memories)संपला.
“विश्वासराव, तुकोबांचा आणि तुमचा संबंध कसा?”
नंतरच्या काळात, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दादांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी थेट संवाद साधला. सकाळी सातलाच कलासागर येथे बोलावलं होतं. अत्यंत संयमी, मिश्किल उत्तरं देत त्यांनी पत्रकारांचे प्रश्न हाताळले.त्या वेळी मी त्यांना ‘पाउले तुकोबांची’ हा ग्रंथ भेट दिला. विलास लांडे यांनी ओळख करून दिली.“मोरे आणि तुकाराम… रामकृष्ण मोरे आणि देहूचे तुमचं नातं काय?”हा दादांचा थेट प्रश्न.मी सांगितलं—“दादा, आम्ही तुकोबांचे पाईक. वारकरी परंपरेत वाढलो.”पुस्तक चाळताना मुखपृष्ठ, मांडणी, आशय याचं त्यांनी मनापासून कौतुक केलं.
“हे पुस्तक आज संध्याकाळी मला द्या, वाचायचं आहे,” अशी आपुलकीची सूचना देत, “काही मदत लागली तर थेट सांगा,” असंही ते म्हणाले.
फोटो काढून ते पुढच्या कामासाठी निघून गेले.
लोकनेत्यास विनम्र अभिवादन
जनतेशी नाळ असलेला, सामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेला नेता आपल्यातून निघून गेला. दादांची ही अकाली एक्झिट केवळ कार्यकर्त्यांसाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची आहे.
असा दादा होणे नाही…!
— डॉ. विश्वास मोरे
(संत व लोकसाहित्याचे अभ्यासक)
