Home महाराष्ट्र Ladki Bahin-KYC:माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-KYC मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ; तांत्रिक अडचणींचा सरकारने घेतला विचार

Ladki Bahin-KYC:माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-KYC मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ; तांत्रिक अडचणींचा सरकारने घेतला विचार

by Admin
Spread the love

प्रतिनिधी – राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक असलेल्या ई-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १८ नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख होती. मात्र, लाभार्थी महिलांना येणाऱ्या तांत्रिक समस्या, काही जिल्ह्यांतील नैसर्गिक आपत्ती आणि ओटीपी संदर्भातील तक्रारींचा विचार करून ही मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती महिला आणि (Ladki Bahin-KYC) बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

ई-KYC करताना महिलांच्या आधार-लिंक मोबाईलवर पहिला ओटीपी, तर पती किंवा वडिलांच्या आधार-लिंक क्रमांकावर दुसरा ओटीपी जाणे आवश्यक असते. अनेकांना हा दुसरा ओटीपी प्राप्त न झाल्याने प्रक्रिया अपूर्ण राहत असल्याची मोठ्या प्रमाणावर नोंद झाली आहे. याशिवाय, काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे मोबाईल क्रमांक निष्क्रिय झाले असून त्यामुळेही (Ladki Bahin-KYC)अडचणी निर्माण झाल्या आहेत.

 

नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांची झालेले नुकसान, मोबाईल हरवणे, कागदपत्रे उपलब्ध नसणे अशा कारणांमुळेही अनेक लाभार्थींना ई-KYC पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने वाढीव मुदतीचा निर्णय घेतला (Ladki Bahin-KYC)आहे.

 

पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांनी ई-KYC करताना मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट झालेल्या महिलांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश सादर करणे आवश्यक राहील, (Ladki Bahin-KYC)असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

 

सरकारने सर्व पात्र महिलांना दिलेल्या वाढीव कालावधीत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00