पिंपरी, दि. ८ जून २०२६ : “जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. स्त्रिया जात्यावर दळताना ओव्या रचत आणि गात असत. त्यातून आपल्या मौखिक लोकसाहित्याची समृद्ध परंपरा निर्माण झाली,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी(Chinchwad Kavisammelan) केले.
शब्दधन काव्यमंचाच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथील गोशाळा सभागृहात रविवारी (दि. ७ जून) साहित्यविश्वातील पहिल्या अभिनव ‘सुंदर माझे जाते गं…’ या जात्यावर दळताना आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत (Chinchwad Kavisammelan)होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छाया कांकरिया होत्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, प्रबोधनकार शारदा मुंडे, जात्यावरील ओव्या गायिका इंदुबाई कणसे तसेच शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळकृष्णाच्या वेशभूषेतील सानवी स्वप्निल चव्हाण ही बालिका उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू (Chinchwad Kavisammelan)ठरली.
सजविलेल्या जात्याचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन, सुभाष चव्हाण यांचे मंगलमय शंखवादन आणि संत जनाबाई यांच्या ओव्यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात (Chinchwad Kavisammelan)झाली.
त्यानंतर झालेल्या कविसंमेलनात संजय गमे, शोभा जोशी, तानाजी एकोंडे, राधाबाई वाघमारे, बाळकृष्ण अमृतकर, मेहमुदा शेख, आय. के. शेख, अंबादास रोडे, फुलवती जगताप, कैलास भैरट, संगीता सलवाजी, शामराव सरकाळे, कल्पना बंब, सूर्यकांत भोसले, शामला पंडित, जयश्री श्रीखंडे आणि सुभाष चटणे यांनी बाळकृष्णाच्या उपस्थितीत जात्यावर दळण दळत स्वरचित गेय कवितांचे सादरीकरण केले. तसेच इंदुबाई कणसे यांनी पारंपरिक ओव्यांचे गायन करून उपस्थितांची दाद (Chinchwad Kavisammelan)मिळवली.
नारायण कुंभार यांनी कविसंमेलनाचा लालित्यपूर्ण शैलीत आढावा घेतला. शारदा मुंडे यांनी प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले, तर नंदकुमार मुरडे यांनी प्रभावी कथाकथन सादर केले. अध्यक्षीय समारोपात छाया कांकरिया यांनी शब्दधन काव्यमंचाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक (Chinchwad Kavisammelan)केले.
याप्रसंगी संयुजा टाटिया यांच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात (Chinchwad Kavisammelan)आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीरा कंक, अशोकमहाराज गोरे, अण्णा गुरव, बाळासाहेब साळुंके, दत्ता कांगळे, अरुण घोडके, सुधीर भालेराव, शोभना भालेराव आणि मानसी चिटणीस यांनी सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मुरलीधर दळवी यांनी आभार प्रदर्शन (Chinchwad Kavisammelan)केले.
