Home आरोग्य PET CT Machine:आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT स्कॅन मशीनचे लोकार्पण; कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा

PET CT Machine:आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT स्कॅन मशीनचे लोकार्पण; कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा

आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये २७ कोटींच्या अत्याधुनिक PET-CT स्कॅन मशीनचे लोकार्पण. कर्करोगाचे अचूक निदान व वेळेवर उपचारासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा.

by Admin
Spread the love

आळंदी, दि. २७ : आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक PET-CT स्कॅन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांना अचूक निदानासाठी मुंबई किंवा पुण्यातील इतर केंद्रांवर जाण्याची गरज कमी होणार असून, वेळेवर उपचार सुरू करणे शक्य होणार (PET CT Machine)आहे.

 

१२ सप्टेंबर २०२४ रोजी रुग्णालयाच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे PET-CT स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत ही सुविधा साकारण्यात (PET CT Machine)आली.

 

यावेळी राज्यात कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार यासाठी त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले. तसेच नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने कर्करोग निदान, उपचार आणि संशोधनाला चालना मिळणार असल्याचेही नमूद करण्यात (PET CT Machine)आले.

 

“आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या भावनेतून सामान्य नागरिकांना अत्याधुनिक उपचार माफक दरात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवाभाव यांचा संगम असलेली ही PET-CT स्कॅन सुविधा कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आशेचा नवा किरण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात (PET CT Machine)आला.

 

याप्रसंगी इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त, वैद्यकीय अधिकारी, संचालक, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात(PET CT Machine) आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00