Home महाराष्ट्र Inner Wheel Club Nigdi Pride:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यशाळा

Inner Wheel Club Nigdi Pride:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यशाळा

उमलत्या वयाशी जुळवून घेताना' कार्यशाळेत ३६७ विद्यार्थ्यांचा सहभाग; १३ तज्ज्ञांकडून विविध जीवनोपयोगी विषयांवर मार्गदर्शन

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि ज्ञानप्रबोधिनीच्या संवादिनी गटाच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ विद्यालय, चिंबळी फाटा येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी “उमलत्या वयाशी जुळवून घेताना” या विषयावरील प्रभावी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदलांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

सुमारे सहा तास चाललेल्या या कार्यशाळेत १३ तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना विविध जीवनोपयोगी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रसारमाध्यमांचा जबाबदारीने वापर, व्यसनमुक्ती, सुदृढ मैत्री, शारीरिक व मानसिक आरोग्य, लैंगिक दुर्वर्तनापासून संरक्षण तसेच ताणतणावाचे प्रभावी व्यवस्थापन अशा विषयांवर संवादात्मक पद्धतीने सत्रे घेण्यात आली.

 

या कार्यशाळेत इयत्ता नववी व दहावीतील एकूण ३६७ विद्यार्थ्यांनी, त्यामध्ये १६६ मुली आणि २०१ मुलांनी, उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना दारू, तंबाखू आणि अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर योग्य मित्रपरिवाराची निवड, निरोगी जीवनशैलीचा स्वीकार, वैयक्तिक सुरक्षितता, मानसिक आरोग्याची जपणूक आणि ताणतणावावर मात करण्याचे प्रभावी मार्ग याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट किशोरवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदलांविषयी योग्य दिशा देणे, व्यसनमुक्त जीवनाचा संदेश पोहोचविणे, प्रसारमाध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव निर्माण करणे, सुदृढ मैत्री आणि सकारात्मक जीवनमूल्ये विकसित करणे, लैंगिक दुर्वर्तनापासून संरक्षण व वैयक्तिक सुरक्षिततेबाबत सजग करणे, तसेच ताणतणावावर प्रभावीपणे मात करण्यासाठी आवश्यक जीवनकौशल्ये विकसित करणे हे होते. विद्यार्थ्यांना निरोगी, जबाबदार आणि आत्मविश्वासपूर्ण नागरिक म्हणून घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

 

या संयुक्त उपक्रमासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा दीपाली जाधव, सचिव ॲड. आरती जाधव तसेच सदस्य सोनाली गडसिंग आणि निवेदिता गाडगीळ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या पुढाकारामुळे कार्यशाळेचे यशस्वी आयोजन होऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण करण्यास मोठी मदत झाली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00