Home माझं पिंपरी चिंचवड Ravindra Chavan Bjp Pcmc :भाजपा महाबैठक-पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर मतदार नोंदणीचे लक्ष्य, ५ हजार रक्तदानाचे आवाहन

Ravindra Chavan Bjp Pcmc :भाजपा महाबैठक-पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर मतदार नोंदणीचे लक्ष्य, ५ हजार रक्तदानाचे आवाहन

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक पार पडली. पदवीधर मतदार नोंदणी, ५ हजार रक्तदानाचे लक्ष्य आणि आगामी संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे भाजपा पदाधिकारी महाबैठक पार पडली. बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी मोहीम, रक्तदान अभियान आणि आगामी संघटनात्मक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात (Ravindra Chavan Bjp Pcmc) आला.

 

मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर मतदार नोंदणीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरात किमान ७५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व हार्ड कॉपी वेळेत जमा करण्याच्या तसेच कामाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्यासाठी स्वतंत्र चार्ट तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. २० ऑगस्टपर्यंत ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट(Ravindra Chavan Bjp Pcmc) केले.

 

रक्तदान मोहिमेबाबत बोलताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर एक लाख रक्तदानाचा संकल्प करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराने किमान ५ हजार रक्तदानाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाढदिवसानिमित्त अनावश्यक जाहिरातबाजी करण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरांवर भर द्यावा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना (Ravindra Chavan Bjp Pcmc) सांगितले.

 

प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनीही संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. बीएलए-२चे काम पूर्ण झाले असले, तरी मतदारांचे मॅपिंग अपेक्षित गतीने झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील १८ दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. नगरसेवक आणि संघटना हे वेगळे नसून सर्वांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट (Ravindra Chavan Bjp Pcmc) केले.

बैठकीस प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पदवीधर नोंदणी प्रमुख राजेश पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, मंडळाध्यक्ष, विविध आघाडी, मोर्चे, प्रकोष्ठ व सेलचे पदाधिकारी तसेच तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील बीएलए-१ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Ravindra Chavan Bjp Pcmc) होते.

बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले. सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर आभार सरचिटणीस विकास डोळस यांनी(Ravindra Chavan Bjp Pcmc) मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00