Home क्रीडा SRH vs RCB IPL 2026 : हैदराबादचा मोठा विजय, तरीही क्वालिफायर 1 हुकला; RCB-GT आमनेसामने

SRH vs RCB IPL 2026 : हैदराबादचा मोठा विजय, तरीही क्वालिफायर 1 हुकला; RCB-GT आमनेसामने

IPL 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादने RCB वर दणदणीत विजय मिळवला, पण नेट रनरेटमुळे क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश मिळवता आला नाही. आता RCB आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर 1 होणार.

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी )सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग (IPL) २०२६ मध्ये शुक्रवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (RCB) दणदणीत विजय मिळवला. मात्र, हा मोठा विजय मिळवूनही SRH ला क्वालिफायर १ मध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे २६ मे रोजी धर्मशाला येथे RCB आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर १ चा सामना होणार हे निश्चित झाले आहे. SRH ला क्वालिफायर १ मध्ये पोहोचण्यासाठी RCB ला १६० धावांच्या आत रोखणे आवश्यक होते, पण त्यात ते अपयशी ठरले. परिणामी, आता त्यांना २७ मे रोजी एलिमिनेटर सामना खेळावा लागणार (SRH vs RCB IPL 2026)आहे.

 

या सामन्यात SRH ने आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा २५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्यांनी तब्बल सहाव्यांदा २५०+ धावांचा टप्पा पार केला. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन आणि हेनरिच क्लासन यांनी RCB च्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार (SRH vs RCB IPL 2026)घेतला.

 

अभिषेक शर्माने केवळ २२ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर इशान किशन आणि हेनरिच क्लासन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ११३ धावांची भागीदारी रचत RCB वर दबाव वाढवला. क्लासनने २४ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ५१ धावा केल्या, तर इशान किशनने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावांची दमदार खेळी साकारली. अखेरीस नितीश कुमार रेड्डीने १२ चेंडूत २९ धावा करत SRH ला ४ बाद २५५ धावांपर्यंत (SRH vs RCB IPL 2026)पोहोचवले.

 

२५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना RCB ची सुरुवात आक्रमक झाली. २०२३ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये सलामीला आलेल्या वेंकटेश अय्यरने विराट कोहलीसोबत पहिल्या विकेटसाठी अवघ्या ४.३ षटकांत ६० धावा जोडल्या. वेंकटेशने १९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४४ धावा केल्या. मात्र, इशान मलिंगाने त्याला बाद करत SRH ला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच षटकात साकिब हुसेनने विराट कोहलीला १५ धावांवर माघारी (SRH vs RCB IPL 2026)धाडले.

 

RCB ने ७४ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. त्यानंतर मलिंगाने देवदत्त पडिक्कललाही २१ धावांवर बाद करत SRH चे पारडे जड केले. तरीही RCB ने १० षटकांत ३ बाद १०० धावांपर्यंत मजल मारली (SRH vs RCB IPL 2026)होती.

 

नेट रनरेटच्या समीकरणानुसार SRH ला RCB वर किमान ९० धावांनी विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या यांनी RCB चा डाव सावरत संघाला २०० धावांपर्यंत पोहोचवले आणि क्वालिफायर १ मधील स्थान पक्के (SRH vs RCB IPL 2026) केले.

 

पाटीदारने ३९ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने कृणाल पांड्यासह ५७ चेंडूत ८४ धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्या ३१ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावांवर नाबाद राहिला. टीम डेव्हिडनेही १५ धावांची नाबाद खेळी करत RCB ला ४ बाद २०० धावांपर्यंत (SRH vs RCB IPL 2026) पोहोचवले.

 

या निकालानंतर RCB अव्वल स्थानावर कायम राहिली, तर गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर राहणार आहे. दुसरीकडे, SRH ला आता एलिमिनेटर सामना खेळावा लागणार असून या शर्यतीत पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघही (SRH vs RCB IPL 2026) आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00