मुंबई :आयपीएल २०२६ मधील अहमदाबाद येथे झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी पराभव करत दमदार पुनरागमन केले. सलग पराभवानंतर मुंबईसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा (IPL 2026 MI VS GT) ठरला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात काहीशी अडखळली होती. मात्र तिलक वर्माने जबाबदारी स्वीकारत अवघ्या ४५ चेंडूत नाबाद १०१ धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. नामन धीरनेही महत्त्वपूर्ण साथ देत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत (IPL 2026 MI VS GT ) पोहोचवले.
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. अश्वनी कुमारने भेदक मारा करत चार बळी घेत गुजरातच्या मधल्या फळीचा कणा मोडला. जसप्रीत बुमराहसह इतर गोलंदाजांनीही अचूक साथ (IPL 2026 MI VS GT )दिली.
या विजयामुळे मुंबई इंडियन्सने स्पर्धेत पुन्हा दमदार हजेरी लावली असून प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सला घरच्या मैदानावर मोठा धक्का बसला (IPL 2026 MI VS GT )आहे.
