Home गुन्हे Double Murder Alandi :आळंदीतील दुहेरी हत्याकांडाने खळबळ; आजी-नातीची निर्घृण हत्या

Double Murder Alandi :आळंदीतील दुहेरी हत्याकांडाने खळबळ; आजी-नातीची निर्घृण हत्या

आळंदी हत्याकांड, दुहेरी हत्या पुणे, केळगाव हनुमानवाडी, आजी नात हत्या, पुणे गुन्हेवार्ता, पिंपरी चिंचवड पोलीस, खून प्रकरण, महाराष्ट्र क्राइम न्यूज, आळंदी बातम्या, गुन्हे तपास

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आळंदी परिसरातील केळगाव (हनुमानवाडी) येथील ठाकरवस्तीमध्ये दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ६० वर्षीय महिलेचा आणि तिच्या ६ वर्षांच्या नातीचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले (Double Murder Alandi) आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दोघीही घरात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी घरात घुसून निर्घृणपणे त्यांची हत्या केली. घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला (Double Murder Alandi)आहे.

 

या दुहेरी हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरीचा उद्देश की वैयक्तिक वाद, याबाबत पोलीस विविध शक्यता तपासत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार आरोपी परिचित असण्याची शक्यता व्यक्त केली जात(Double Murder Alandi) आहे.

 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनास्थळावरील पुरावे गोळा केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांची चौकशी सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला (Double Murder Alandi)आहे.

 

या घटनेमुळे आळंदी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून सुरक्षेच्या प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त केली जात (Double Murder Alandi)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00