प्रतिनिधी :निगडी आणि प्राधिकरण परिसरात आज दुपारी झालेल्या तुफानी अवकाळी पावसामुळे नागरिकांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे (Unseasonal Rain) लागले.
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. प्राधिकरण, आकुर्डी, भक्ती-शक्ती चौक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनचालकांना अडकून पडावे लागले, तर काही ठिकाणी दुचाकी बंद पडल्याच्या घटना (Unseasonal Rain )घडल्या.
पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. निचांकी भागात पाणी साचल्याने पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती समोर आली( Unseasonal Rain)आहे.
सलग पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत(Unseasonal Rain )आहे.
