Home प्रेरणा / यशकथा Girish Prabhune:युवा शक्ती भारताचे भविष्य बदलू शकते – प्रतिभा सृजन व्याख्यानमालेत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे मार्गदर्शन

Girish Prabhune:युवा शक्ती भारताचे भविष्य बदलू शकते – प्रतिभा सृजन व्याख्यानमालेत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे मार्गदर्शन

चिंचवड येथील कमला शैक्षणिक संकुलात आयोजित प्रतिभा सृजन व्याख्यानमालेच्या समारोपात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी युवा शक्तीच्या सामर्थ्यावर भाष्य केले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :युवा शक्ती भारताचा चेहरा बदलू शकते, असे प्रेरणादायी प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवड येथील कमला शैक्षणिक संकुलात केले. संस्थेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचा समारोप उत्साहात झाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रभुणे म्हणाले की, तरुणांनी धाडसाने नवीन वाटा शोधल्या, तर भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनण्यास वेळ लागणार नाही. भारताचे भविष्य घडविण्याची ताकद युवा वर्गात आहे, यावर त्यांनी भर (Girish Prabhune) दिला.

या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील विलक्षण कार्यासाठी संस्थेच्या वतीने प्रभुणे यांना प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थापक डॉ. दीपक शहा, अध्यक्षा प्रतिभा शहा, खजिनदार भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा आणि कुटुंबीयांनी पुणेरी पगडी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा (Girish Prabhune) गौरव केला.

पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त करताना प्रभुणे यांनी विमुक्त आणि भटक्या समाजात कार्य करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले. वडारी, डोंबारी, पारधी, वडार अशा समाजांनी कला आणि शौर्याने योगदान दिले, तरीही त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा पुरस्कार त्या कष्टकरी समाजाला समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले. २०४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील; पुढील २० ते २५ वर्षात देशातील अनेक समस्या युवा शक्तीच्या बळावर दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त(Girish Prabhune) केला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, २००६ मध्ये संस्थेची पायाभरणी झाली आणि आज विविध शाखांमध्ये आठ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थेचा सतत प्रामाणिक प्रयत्न असतो, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा आणि समाजातील उल्लेखनीय कार्यकर्त्यांना प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार देण्याचा संकल्प (Girish Prabhune) त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी आपल्या मनोगतात डॉ. दीपक शहा यांच्या कार्याचा गौरव केला. शून्यातून उभे राहून संपूर्ण संस्थेची निर्मिती करणे हे त्यांचे मोठे कर्तृत्व असल्याचे ते म्हणाले. नेतृत्व आणि कर्तृत्व असतेच, परंतु देण्याची वृत्ती असणे महत्त्वाचे असून डॉ. शहा यांच्यात ती भावनाच दिसते. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कामाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, समाज घडवण्याची ताकद एका माणसातही असू शकते आणि प्रभुणे हे त्याचे जिवंत (Girish Prabhune) उदाहरण आहेत


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00