Home पुणे Shankar Jagtap:राज्यातील कारखान्यांची विशेष तपासणी; कामगार सुरक्षेसाठी नवे धोरण – आमदार शंकर जगताप

Shankar Jagtap:राज्यातील कारखान्यांची विशेष तपासणी; कामगार सुरक्षेसाठी नवे धोरण – आमदार शंकर जगताप

कामगार सुरक्षेसाठी राज्यातील कारखान्यांची विशेष तपासणी; आमदार शंकर जगताप यांच्या लक्षवेधीवर मोठा निर्णय

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड – औद्योगिक क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांनी त्रस्त झालेल्या कामगार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी विधीमंडळात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला (Shankar Jagtap) आहे.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सभागृहात सांगितले की, राज्यातील सर्व कारखान्यांची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, ‘व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता 2020’ नुसार कारखान्यांच्या निरीक्षणासाठी नवीन धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे सुरक्षिततेचे नियम मोडल्यास थेट दंडात्मक खटला दाखल होणार(Shankar Jagtap) आहे.

भोसरी एमआयडीसी स्फोटानंतर जगताप यांची तत्पर भूमिका

२५ नोव्हेंबर रोजी भोसरी एमआयडीसीतील अंबिका पावडर कोटिंग कंपनीतील भीषण स्फोटात एकाचा मृत्यू आणि पाच जणांच्या जखमी होण्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. या प्रकरणात सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे नमूद करत आमदार जगताप यांनी सभागृहाचे लक्ष (Shankar Jagtap)वेधले.

जगताप म्हणाले की,“कारखान्यांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत नाही; निष्काळजी वृत्तीमुळे कामगारांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा घटनांची उच्चस्तरीय चौकशी आणि एमआयडीसीमधील सर्व कंपन्यांचे तातडीने सेफ्टी ऑडिट आवश्यक(Shankar Jagtap) आहे.”

त्यांनी उपकरणांची नियमित देखभाल, गॅस व्यवस्थापन, कामगारांचे सुरक्षा प्रशिक्षण, आणि कारखानदारांवरील कडक कारवाईची गरज अधोरेखित (Shankar Jagtap) केली.

मंत्र्यांची घोषणा : ‘स्पेशल ड्राईव्ह’द्वारे राज्यभर तपासणी

कामगार मंत्री फुंडकर यांनी जगताप यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत खालील निर्णयांची घोषणा(Shankar Jagtap) केली:

राज्यातील सर्व एमआयडीसी परिसरात **‘स्पेशल ड्राईव्ह’**द्वारे कारखान्यांची तपासणी

सुरक्षित साधने नसताना कामगार काम करताना आढळल्यास कंपनीवर थेट गुन्हा दाखल

विनापरवाना उभारलेल्या आणि सुरक्षा मानके न पाळणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई

दुर्घटनेत मृत झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला साडेतीन लाखांची नुकसानभरपाई

फुंडकर यांनी स्पष्ट केले की, “औद्योगिक दुर्घटनांना आता कुठल्याही परिस्थितीत खतपाणी घालणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात(Shankar Jagtap) येईल.”

कामगार सुरक्षेसाठी मोठे पाऊल – आमदार जगताप

आमदार जगताप यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की,
“पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर आहे. येथे कामगार सुरक्षितता हा संवेदनशील मुद्दा आहे. विधिमंडळात केलेल्या मांडणीला सरकारने गांभीर्याने प्रतिसाद दिला, ही कामगारांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.”

त्यांनी विश्वास व्यक्त केला की नवीन धोरणे व तपासणीमुळे राज्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये कामगार सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल आणि निष्काळजी कंपन्यांना यापुढे मोकळीक (Shankar Jagtap)मिळणार नाही.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00