Home आरोग्य LPG Cylinder Shortage :आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडर टंचाई, काळाबाजाराला ऊत

LPG Cylinder Shortage :आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडर टंचाई, काळाबाजाराला ऊत

आखाती देशांतील तणावाचा परिणाम पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस पुरवठ्यावर; घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा. काही ठिकाणी १५०० ते २००० रुपयांत काळाबाजार. नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक अडचणीत.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला असून, या परिस्थितीचा गैरफायदा घेत गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत आहे. गॅसअभावी गृहिणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर हॉटेल व्यावसायिकही मोठ्या संकटात सापडले (LPG Cylinder Shortage) आहेत.

पुरवठा साखळी विस्कळीत

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत असून कच्चे तेल आणि एलपीजी (LPG) पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील अनेक गॅस एजन्सींना मिळणारा सिलिंडर साठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर मिळण्यासाठी १० ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे वितरणाचे नियोजन कोलमडले असून त्याचा सर्वाधिक फटका सामान्य ग्राहकांना बसत (LPG Cylinder Shortage)आहे.

 

काळाबाजार आणि अव्वाच्या सव्वा दर

गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फायदा घेत काही ठिकाणी अनधिकृतपणे गॅस विक्री सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. घरगुती वापराचे सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वळवले जात असून गरजू ग्राहकांकडून एका सिलिंडरसाठी १५०० ते २००० रुपयांपर्यंत वसुली केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही गॅस एजन्सीतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा काळाबाजार सुरू असल्याचीही चर्चा शहरात सुरू (LPG Cylinder Shortage) आहे.

गृहिणी आणि व्यावसायिकांचे हाल

वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक गृहिणींना पर्यायी व्यवस्था म्हणून चुलीचा किंवा इंडक्शन शेगडीचा वापर करावा लागत आहे. “महिनाभर आधी बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नाही, पण बाहेर दुप्पट किमतीत गॅस सहज मिळतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका गृहिणीने व्यक्त (LPG Cylinder Shortage) केली.

गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक लहान खानावळींना व्यवसाय चालवणे कठीण झाले असून काहींनी दर वाढवले आहेत, तर काही व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र (LPG Cylinder Shortage) आहे.

प्रशासनाकडून कारवाईची मागणी

गॅस वितरणातील हा गोंधळ आणि वाढता काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आखाती देशांतील तणावाचे कारण पुढे करून सामान्य जनतेची लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता शहरातून जोर धरू लागली (LPG Cylinder Shortage) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00