पिंपरी-चिंचवड : अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि.), महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मनपा मुख्यालयातील भा.वि. कांबळे सभागृहात स्वागत व सत्कार करण्यात (PCMC Commissioner) आला.
यावेळी सत्कारास उत्तर देताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी पत्रकारांचे महत्त्व अधोरेखित करत, “पत्रकार म्हणजे माझे डोळे आणि कान आहेत,” असे सांगितले. पत्रकार बांधव-भगिनी आपले कर्तव्य पार पाडताना प्रशासनाला योग्य दिशादर्शन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पत्रकारांना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी (PCMC Commissioner)दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक व ‘माझा आवाज’चे संपादक बापूसाहेब गोरे यांनी प्रास्ताविक करताना पत्रकार संघाची भूमिका थोडक्यात पण प्रभावीपणे (PCMC Commissioner)मांडली.
यावेळी मनपाचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, विनय लोंढे, बाळासाहेब ढसाळ, बाबू कांबळे, प्रवीण शिर्के, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, लीना माने, विवेक कुलकर्णी, सिता जगताप, सूरज साळवे, संतोष जराड, भीमराव बरकडे, अविनाश कांबीकर, देवा भालके, मुकेश जाधव, गणेश मोरे, विकास साळवे, श्रद्धा प्रभुणे, गणेश शिंदे, अर्चना मेंगडे, सोमनाथ काळे आदींसह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित (PCMC Commissioner)होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सूरज साळवे यांनी प्रभावी आणि रसाळ शैलीत (PCMC Commissioner)केले.
