Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Power Politics: सत्ता भाजपाकडे, पण सत्तेची चावी कुणाकडे?

PCMC Power Politics: सत्ता भाजपाकडे, पण सत्तेची चावी कुणाकडे?

पिंपरी-चिंचवड मनपेत भाजप सत्ता स्थापन झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ‘पहिलं नाव’ जवळपास फायनल झाल्याची चर्चा. महेशदादा लांडगे, हायकमांड हालचाली आणि गोटातील राजकारणावर इनसाइड अपडेट.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड — पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपावर विश्वास टाकत महानगरपालिकेची सत्ता स्पष्ट बहुमताने दिली, हे जरी निकालातून स्पष्ट झाले असले, तरी आता शहराच्या राजकारणात खरी लढाई सुरू झाली आहे ती सत्तेच्या खुर्च्यांवर कोण बसणार, यासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सत्ता मिळाली, असे जाहीरपणे बोलले जात असले, तरी खऱ्या अर्थाने सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात असतील, याबाबत भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली (PCMC Power Politics) आहे.

महेशदादा लांडगे : ‘अनडिस्प्यूटेड पॉवर सेंटर’

भोसरीचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे हे सध्या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील अनधिकृत ‘सुपर बॉस’ म्हणून पाहिले जात आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी मनपावर, प्रशासनावर आणि पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेवर जो वचक बसवला, त्यामुळेच ते बघता-बघता शहरातील सर्वात प्रभावशाली नेते(PCMC Power Politics)  बनले.

लोकप्रिय आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी महेशदादांनी क्षणार्धात भरून काढली, हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही मान्य करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर उघड, जाहीर आणि आक्रमक टीका करत “मी कोणालाच घाबरत नाही” असा स्पष्ट राजकीय संदेश दिला. या भूमिकेमुळे ते भाजपातील ‘हार्डकोअर लीडर’ म्हणून अधिक मजबूत झाले (PCMC Power Politics) आहेत.

 

महेशदादांच्या मर्जीतली यादी तयार?

भाजपाच्या गोटात सध्या एकच चर्चा आहे —

“महेशदादांची ग्रीन सिग्नल असलेल्यांनाच सत्तेची चावी मिळणार.”

आतल्या सूत्रांनुसार, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विषय समित्या, महत्त्वाच्या सभापती पदांवर कोण बसणार, याची प्राथमिक रूपरेषा आधीच तयार असल्याची कुजबुज आहे. त्यामुळे अनेक नव्या नगरसेवकांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत भोसरीचा रस्ता वारंवार तुडवला जात आहे, ही बाब आता लपून राहिलेली (PCMC Power Politics )नाही.

टीम गेमचा मुद्दा : इतर आमदारांची चाचपणी

तरीही भाजप हे केवळ एका नेत्याचे पक्षराजकारण नाही, तर टीम म्हणून काम केल्यावरच विजय मिळतो, हा मुद्दा वरिष्ठ नेतृत्वाच्या पातळीवर मांडला जात (PCMC Power Politics )आहे.

याच अनुषंगाने —निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतलेले आमदार शंकर जगताप,प्रचारयंत्रणा प्रभावीपणे हाताळणारे आमदार अमित गोरखे,महिला मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करणाऱ्या आमदार उमाताई खापरे,संघटन मजबूत ठेवणारे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे,यांच्या मताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास नाराजीचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत((PCMC Power Politics)  आहेत.

आये गये’ नगरसेवकांची धास्ती

यंदाच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले काही नगरसेवकही आहेत. हे नगरसेवक उघडपणे काही बोलत नसले, तरी “आम्ही सत्ता आणली, आम्हालाही वाटा हवा” अशी त्यांची (PCMC Power Politics )अपेक्षा आहे.

जर त्यांना पूर्णपणे डावलण्यात आले, तर पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेडसावत (PCMC Power Politics) आहे.

महापौरपेक्षा ‘कुबेर’ कोण?

राजकीय जाणकारांचे एकमत आहे की, महापौर पद हे सन्मानाचे असले, तरी प्रत्यक्ष सत्ता स्थायी समिती अध्यक्षाकडे असते.

अर्थसंकल्प, ठेके, विकासकामे, निधीवाटप — सर्व सूत्रे स्थायी समितीच्या हातात असल्यानेच या पदाला“मनपातला कुबेर” असे म्हटले जाते.म्हणूनच, भाजपात खरी रस्सीखेच स्थायी समिती अध्यक्षपदासाठीच सुरू आहे, महापौरपद हे त्यापुढे दुय्यम ठरत असल्याची स्पष्ट चर्चा (PCMC Power Politics ) आहे.

ही नावे का महत्त्वाची ठरतात?

सध्या गोटात खालील नावे सातत्याने चर्चेत आहेत —

शैलजाताई मोरे — अनुभव, वरिष्ठता आणि महिला नेतृत्वाचा चेहरा

शत्रुघ्न काटे — संघटनात्मक ताकद आणि शहराध्यक्ष पदाची नैतिक ताकद

राजू मिसाळ — राष्ट्रवादीतून भाजपात येऊन पूर्ण पॅनल निवडून आणण्याची कामगिरी

अनुराधा गोरखे — अमित गोरखे यांची आई,,राजकीय ताकद आणि विश्वासार्ह चेहरा

यापैकी कुणाला कोणते पद मिळते, यावरच पुढील पाच वर्षांचे शहराचे सत्तासमीकरण ठरणार (PCMC Power Politics ) आहे.

दिल्ली–मुंबई–पुणे वायर अ‍ॅक्टिव्ह

सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व घडामोडींची माहिती दिल्ली आणि मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय स्थानिक नव्हे, तर हायकमांड स्तरावरून होण्याची शक्यता नाकारता येत (PCMC Power Politics )नाही.

✍️ विवेक कुलकर्णी

संपादक – माझं पिंपरी चिंचवड


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00