पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने निवडणूक प्रक्रिया औपचारिक (Abhishek Barne)ठरली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)च्या १६ सदस्यीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे अभिषेक बारणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा आज शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका मुख्यालयात झालेल्या विशेष सभेत करण्यात (Abhishek Barne )आली.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने बारणे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. आज पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात (Abhishek Barne )आले.
स्थायी समितीत भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चार आणि शिवसेना (शिंदे गट)चा एक सदस्य आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधकांकडून उमेदवारी न दिल्याने निवडणूक बिनविरोध(Abhishek Barne ) झाली.
अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे, संदीप कस्पटे आणि बाबा त्रिभुवन यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. अखेर आमदार शंकर जगताप यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या बारणे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. बारणे यांनी बुधवारी नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला (Abhishek Barne )होता.
यावेळी आमदार शंकर जगताप, उपमहापौर शैलजा बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे तसेच भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे (Abhishek Barne )उपस्थित होते.
आज सकाळी ११ वाजता स्थायी समिती सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महानगरपालिकाच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली(Abhishek Barne ) होती.
महापालिकेच्या राजकारणात ही निवड महत्त्वाची मानली जात असून आगामी अर्थसंकल्प, विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये बारणे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा (Abhishek Barne) दिल्या.
स्थायी समिती ही महापालिकेची आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. त्यामुळे सभापतीपदी झालेली ही बिनविरोध निवड राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली (Abhishek Barne) आहे.

