Home पुणे Kamada Ekadashi:आळंदी येथे कामदा एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी | माऊली मंदिर दर्शन

Kamada Ekadashi:आळंदी येथे कामदा एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी | माऊली मंदिर दर्शन

कामदा एकादशी निमित्त आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. इंद्रायणी घाटावर पूजा व स्नान, मंदिरात आकर्षक सजावट.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :दि. २९ रोजी कामदा एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून माऊली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.दर्शन रांगेतील भाविकांमध्ये भक्तीचा सुगंध दरवळत होता. कुठे “ज्ञानोबा तुकाराम”चा जयघोष तर कुठे विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच भाविकांनी भक्तिभावाने माऊलींचे दर्शन ( (Kamada Ekadashi) घेतले.

अजानबाग परिसरात काही भाविक ग्रंथांचे पारायण करताना दिसत होते. एकादशीच्या निमित्ताने माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले (Kamada Ekadashi) होते.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना ऊन लागू नये यासाठी मंदिर परिसरात जाळ्या (नेट) उभारण्यात आल्या होत्या. तसेच नदी घाटावर भाविक पवित्र इंद्रायणी मातेला पूजन करताना दिसत होते, तर काही जण इंद्रायणी नदीत स्नान करत  (Kamada Ekadashi)होते.

एकादशीमुळे चाकण चौकाजवळील वाहनतळ पूर्णपणे भरले होते. मंदिर परिसरातील हार, फुले, प्रसाद तसेच धार्मिक ग्रंथ आणि साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्येही नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत  (Kamada Ekadashi)होती.

https://youtu.be/A0qzq3XCIz4?si=lIKug2cMlKyIwwaC

Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00