Home माझं पिंपरी चिंचवड Shabddhan Kavyamanch:जात्या वरील ओव्यांना कवितेच्या मंचावर मानाचा मुजरा; ‘शब्दधन काव्यमंच’चा अनोखा उपक्रम

Shabddhan Kavyamanch:जात्या वरील ओव्यांना कवितेच्या मंचावर मानाचा मुजरा; ‘शब्दधन काव्यमंच’चा अनोखा उपक्रम

शब्दधन काव्यमंचाच्या वतीने जात्यावरील ओव्यांवर आधारित साहित्यविश्वातील पहिले कविसंमेलन आयोजित. पद्मश्री गिरीश प्रभुणे, छाया कांकरिया, नंदकुमार मुर्डे यांची उपस्थिती लाभणार.

by Admin
Spread the love

पिंपरी प्रतिनिधी :पारंपरिक लोकसाहित्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने ‘शब्दधन काव्यमंच’च्या वतीने साहित्यविश्वातील पहिले आगळेवेगळे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. “सुंदर माझे जाते गं फिरते बहूत, ओव्या गाऊ कौतुक तू येरे बा विठ्ठला…” या संकल्पनेवर आधारित हा विशेष साहित्यिक कार्यक्रम होणार (Shabddhan Kavyamanch)आहे.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ कवयित्री छाया कांकरिया अध्यक्षस्थानी राहणार आहेत. चिंचवड येथील समरसता गुरुकुलम शाळेत रविवार दिनांक 7 जून रोजी हे आगळेवेगळे साहित्य संमेलन पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुर्डे व समाज प्रबोधनकार शारदा मुंडे उपस्थित (Shabddhan Kavyamanch)राहतील.

 

जातेवरील ओव्यांच्या परंपरेचे जतन करणाऱ्या इंदुबाई ज्ञानेश्वर काणसे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गंधलीकर हे सूत्रसंचालन करणार आहेत. लोकपरंपरा, ओव्या आणि ग्रामीण संस्कृतीचा गौरव करणारा हा उपक्रम साहित्यप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरणार (Shabddhan Kavyamanch)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00