(सुरेश कंक )नुकतेच ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणींनी अनेक सुवर्णकाळातील गाणी पुन्हा कानात घुमू लागली. त्यापैकी एक म्हणजे शम्मी कपूर आणि साधना अभिनित “राजकुमार” चित्रपटातील मोहम्मद रफी व सुमन कल्याणपूर यांनी गायलेले अजरामर (Legend Shammi kapoor )युगलगीत…
“तुमने पुकारा और हम चले आये,
जान हथेली पर ले आये रे…”
हे गाणे ऐकले की नकळत आठवतो तो हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आगळावेगळा, बेधुंद आणि उत्स्फूर्त नायक – शम्मी(Legend Shammi kapoor ) कपूर!
१९६० ते १९७० या दशकावर जणू शम्मी कपूर यांचेच अधिराज्य होते. पडद्यावर त्यांची एंट्री झाली की थिएटरमधील वातावरण बदलून जायचे. गाणे सुरू झाले की त्यांची मान एका विशिष्ट लकबीत हलायची, चेहऱ्यावर मिश्कील हास्य यायचे आणि डोळ्यांतून खट्याळ प्रेम (Legend Shammi kapoor )झळकायचे.
“राजकुमार” चित्रपटात साधनासोबतची त्यांची जोडी प्रचंड गाजली. शंकर-जयकिशन यांच्या संगीताने चित्रपटाला चार चाँद लावले.
“इस रंग बदलती दुनिया में इंसान की नियत ठीक नहीं…”
किंवा
“तुमने किसी की जान को जाते हुए देखा है…”
अशी गाणी केवळ ऐकायची नव्हती, तर शम्मी कपूर पडद्यावर ती (Legend Shammi kapoor )जगायचे.
त्या काळात एक समीकरण तयार झाले होते – शम्मी कपूर चित्रपटात म्हणजे निर्मात्याचे पैसे (Legend Shammi kapoor )वसूल!
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक नासीर हुसेन “तिसरी मंजिल” बनवत होते. त्यांनी शम्मी कपूर यांना चित्रपटासाठी विचारणा केली. शम्मी यांनी पहिला प्रश्न विचारला, “संगीत कोण देणार?””राहुल देव बर्मन,” असे उत्तर मिळताच ते थोडे साशंक झाले. त्यांना शंकर-जयकिशन यांचे संगीत हवे होते. पण नासीर हुसेन यांनी युक्ती लढवली. एका छोट्याशा पार्टीत त्यांनी “तिसरी मंजिल”मधील गाणी शम्मींना (Legend Shammi kapoor )ऐकवली.गाणी संपल्यावर शम्मी कपूर उत्साहाने म्हणाले, “ही गाणी कोणी दिली आहेत?”नासीर हुसेन हसून म्हणाले, “आर. डी. बर्मन.”क्षणाचाही विलंब न लावता शम्मी म्हणाले, “नासीरसाब, यह फिल्म मैं करूंगा!”आणि मग जन्म झाला एका सुपरहिट (Legend Shammi kapoor )चित्रपटाचा.
“ओ हसीना जुल्फोंवाली…”
“आजा आजा मैं हूँ प्यार तेरा…”
“ओ मेरे सोना रे…”
“तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ…”
या गीतांनी हिंदी चित्रपटसंगीताला नवा आयाम(Legend Shammi kapoor ) दिला.
यानंतर आला “ब्रह्मचारी”. बारा अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या युवकाची भूमिका शम्मी कपूर यांनी इतक्या ताकदीने साकारली की त्यांना फिल्मफेअर पुरस्कार (Legend Shammi kapoor )मिळाला.
“चक्के पे चक्का…”
“मैं जागूँ तुम सो जाओ…”
“दिल के झरोखे में तुझको बिठाकर…”
या गाण्यांमध्ये त्यांच्या अभिनयाची कोमल बाजू दिसून (Legend Shammi kapoor )आली.
राजश्रीसोबतची त्यांची जोडी रसिकांना खूप भावली.मात्र शम्मी कपूर यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भारतीय प्रेक्षकांना जग (Legend Shammi kapoor )दाखवले.
शक्ती सामंता यांच्या “ॲन इव्हिनिंग इन पॅरिस”मध्ये त्यांनी प्रेक्षकांना थेट पॅरिसच्या रस्त्यांवर नेऊन सोडले. त्या काळी परदेश प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होता. पण दोन रुपयांच्या तिकिटात रसिकांनी पॅरिस(Legend Shammi kapoor ) पाहिले.
“आसमान से आया फरिश्ता…” या गाण्यात हेलिकॉप्टरमधून बोटीवर उतरणारा शम्मी कपूर पाहून प्रेक्षक थक्क(Legend Shammi kapoor ) झाले.
“अकेले अकेले कहाँ जा रहे हो…”
हे गीत रोपवेतील दृश्यांसह चित्रित झाले होते. भारतात रोपवे फारसे परिचित नसताना रसिकांसाठी तो एक वेगळाच अनुभव (Legend Shammi kapoor )होता.
“ॲन इव्हिनिंग इन पॅरिस…”
या शीर्षक गीतातून पॅरिसची रोषणाई, निसर्ग आणि आधुनिकता पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध होत.
“दीवाने का नाम तो पूछो…”
या गाण्यातून पॅरिस शहराची सफर घडत (Legend Shammi kapoor )होती.
शम्मी कपूर यांचे आणखी अनेक चित्रपट गाजले.
“ब्लफ मास्टर”मधील
“गोविंदा आला रे आला…”
“लाट साहब”मधील
“सवेरे वाली गाडी से चले जायेंगे…”
“प्रिन्स”मधील
“बदन पे सितारे लपेटे हुए…”
“पगला कहीं का”मधील
“आशिक हूँ एक महजबीं का…”
आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
काळ पुढे सरकत होता. राजेश खन्ना युगाचा उदय होत होता. “अंदाज” चित्रपटात शम्मी कपूर आणि हेमामालिनी प्रमुख भूमिकेत असले तरी काही मिनिटांच्या भूमिकेत राजेश खन्नाने चित्रपटावर स्वतःची छाप (Legend Shammi kapoor )उमटवली.
“जिंदगी एक सफर है सुहाना…”
हे गाणे नव्या युगाची चाहूल देत होते.
मात्र शम्मी कपूर थांबले नाहीत. त्यांनी आयुष्याची दुसरी इनिंग सुरू केली – चरित्र अभिनेता म्हणून.
“परवरिश”, “नसीब”, “विधाता”, “बेताब”, “हिरो”, “सोहनी महिवाल”, “हिना”, “प्रेमग्रंथ” अशा अनेक चित्रपटांत त्यांनी संस्मरणीय भूमिका (Legend Shammi kapoor )साकारल्या.
“परवरिश”मध्ये अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांनी म्हटलेले गीत आजही आठवते –
“आपस में टकराना कैसा,
गाओ मिलकर साथ मेरे,
मेरे लिये तो हो तुम दोनों,
जैसे ये दो हाथ मेरे…”
रोमँटिक नायक, नृत्याचा बादशहा, संगीतप्रेमी कलाकार आणि नंतर समर्थ चरित्र अभिनेता अशा विविध रूपांत शम्मी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध (Legend Shammi kapoor )केली.
त्यांच्या एका अजरामर गीतानेच या आठवणींचा शेवट करूया…
“तुम मुझे यूँ भुला ना पाओगे,
जब कभी भी सुनोगे गीत मेरे,
संग संग तुम भी ये गुनगुनाओगे…”
खरेच, शम्मी कपूर यांना विसरणे अशक्य आहे. कारण ते केवळ अभिनेता नव्हते; ते एक आनंदी वृत्ती होते, एक उत्सव होते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचे जिवंत प्रतीक(Legend Shammi kapoor ) होते.
