Home माझं पिंपरी चिंचवड Police Commissioner Meet:‘पोलीस आयुक्तांची भेट’ उपक्रमाच्या वेळेत बदल; आता दुपारी ३ ते ५ दरम्यान भेट

Police Commissioner Meet:‘पोलीस आयुक्तांची भेट’ उपक्रमाच्या वेळेत बदल; आता दुपारी ३ ते ५ दरम्यान भेट

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘पोलीस आयुक्तांची भेट’ उपक्रमाच्या वेळेत बदल. आता दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना तक्रारी मांडता येणार.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या थेट जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सुरू केलेल्या ‘पोलीस आयुक्तांची भेट’ या उपक्रमाच्या वेळेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला (Police Commissioner Meet) आहे.

 

नवीन वेळेनुसार, हा उपक्रम आता दर सोमवारी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत आयोजित केला जाणार आहे. यापूर्वी या भेटीची वेळ दुपारी ४.०० ते सायंकाळी ६.०० अशी होती. मात्र सोमवार, ४ मे २०२६ पासून सुधारित वेळ लागू करण्यात आली (Police Commissioner Meet) आहे.

 

या उपक्रमाद्वारे नागरिकांना आपल्या तक्रारी, सूचना आणि समस्या थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे नागरिकांनी नव्या वेळेची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले (Police Commissioner Meet)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00